22 February 2025 3:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

LIC Instant Loan | LIC चे ग्राहक आहात? घरबसल्या कर्ज कसे मिळवायचे? अशी आहे अर्ज प्रक्रिया

LIC Instant Loan

LIC Instant Loan | LIC आपल्या ग्राहकांना शक्य तिक्या सर्व आर्थिक सुविधा देण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हा लोकांना आर्थिक अडचणी असतात तेव्हाही LIC आपल्या ग्राहकांना 20 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देते. LIC चे अनेक ग्राहक कर्ज सुविधेचा लाभ घेतात, कारण ही कर्ज रक्कम मिळवण्याची प्रक्रिया खूप सोपी असते. LIC तून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. LIC मधून कर्ज घेण्यासाठी काही आवश्यक अटीची पूर्तता करावी लागते, उदाहरणार्थ, तुमच्याकडे LIC ची विमा पॉलिसी असावी, तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असावा. ही कागदपत्रे तुमच्याकडे असल्यास, तुम्ही LIC मध्ये कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करू शकता, आणि ऑनलाइन अर्ज केल्यानंतर LIC च्या शाखेला भेट द्यावी लागेल. यानंतर शाखा व्यवस्थापकाकडून तुमच्या अर्जाचा तपासला जाईल. त्यानंतर LIC तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देईल.

एलआयसीचे वैयक्तिक कर्ज :
जर तुम्हाला LIC मधून वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. LIC आता आपल्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज देखील उपलब्ध करून देते. तुम्ही LIC मधून कर्ज मिळवण्यासाठी निवांत घरी बसून अर्ज करू शकता. या कर्जाचे वैशिष्ट्य म्हणजे कर्जावर LIC तुम्हाला कमी व्याज आकारते. ज्यांच्याकडे LIC ची पॉलिसी आहे ते लोक LIC मध्ये प्रकारचे कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात.

कर्जावरील व्याज :
जर तुम्हाला LIC पॉलिसीवर कर्ज हवे असेल तर LIC तुम्हाला कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देते. या कर्जावरील व्याजदर सर्वात कमी असते. LIC तुमच्याकडून 9 टक्के व्याज दराने आपल्या ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून देते. तथापि, LIC मधून तुम्हाला किती कर्ज घेता येईल, हे तुमच्या उत्पन्नावर अवलंबून असते. एलआयसी ग्राहकांना 5 वर्षांसाठी वैयक्तिक कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध करून देते.

कर्ज मिळवण्याची प्रक्रिया :
जर तुमच्याकडे एलआयसी पॉलिसी असेल तर, तुम्ही LIC मधून घरी बसल्या निवांत वेबसाईटवर भेट देऊन कर्ज घेण्यासाठी अर्ज करू शकता. LIC मधून कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज भरावा लागेल, आणि फॉर्म डाउनलोड करून त्यावर स्वाक्षरी करावी लागेल. कर्जाचा फॉर्म नंतर स्कॅन करून एलआयसीच्या वेबसाइटवर अपलोड करावा लागेल. अर्ज सबमिट केल्यावर तुमची कर्ज प्रक्रिया सुरू होईल. LIC मधून तुम्हाला कमाल 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज घेता येते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| LIC Instant Loan procedure and required documents for loan on policy on 01 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

LIC Instant Loan(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x