16 April 2025 1:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
x

LIC Investment | एलआयसीच्या या पॉलिसीत दररोज रु. 262 गुंतवा | मॅच्युरिटीला 20 लाख मिळतील

LIC Investment

LIC Investment | देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी देशातील प्रत्येक घटकाच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी पॉलिसी सुरू करते. कंपनी विम्यासह बचत लाभ असलेली पॉलिसी लाँच करते. लाइफ कव्हरसह विमा लाभासह येणाऱ्या पॉलिसीला एंडोमेंट पॉलिसी म्हणतात.

लाइफ बेनिफिट :
एलआयसीने 1 फेब्रुवारी 2020 रोजी हे उत्पादन बाजारात आणले. एलआयसी जीवन लाभ ही एक नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक योजना आहे. ही एक जीवन हमी बचत योजना आहे जी आकर्षक संरक्षणासह बचत वैशिष्ट्यांसह येते. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचा मॅच्युरिटीपूर्वीच मृत्यू झाला तर नॉमिनीला एकरकमी रक्कम मिळते. याशिवाय तुम्हाला या पॉलिसीअंतर्गत कर्जही मिळू शकतं.

पॉलिसीची मुदत :
पॉलिसी टर्मबद्दल बोलायचे झाले, तर या पॉलिसीमध्ये मॅच्युरिटीसाठी तीन टर्म आहेत. कोणताही गुंतवणूकदार या पॉलिसीमध्ये १६ वर्षे, २१ वर्षे आणि २५ वर्षे मुदतीसाठी गुंतवणूक करू शकतो. त्याचबरोबर तुम्ही 10 वर्ष, 15 वर्ष आणि 16 वर्षांसाठी प्रीमियम जमा करू शकता. ही योजना घेतल्यास मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर तुम्ही त्याचा प्रीमियम भरू शकता.

पॉलिसी घेण्यासाठी वयोमर्यादा :
या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांचे वय आठ ते ५९ वर्षांच्या दरम्यान असावे. या योजनेत तुम्ही किमान दोन लाख रुपयांच्या विमा रकमेसाठी गुंतवणूक करू शकता. मात्र, त्यासाठी कमाल मर्यादा नाही. त्याचबरोबर अतिरिक्त लाभाबद्दल बोलायचे झाले तर या योजनेतील गुंतवणुकीवरील प्राप्तिकरातही माफी मिळते.

तुम्हाला २० लाख रुपये :
एलआयसीच्या वेबसाइटवर उपलब्ध कॅल्क्युलेटरनुसार, एलआयसी जीवन लाभ पॉलिसीमध्ये जर एखाद्या व्यक्तीने २० लाख रुपयांची सम-अॅश्युअर्ड निवडल्यास त्याला १६ वर्षांपर्यंत (प्रीमियम पेमेंट टर्म) करासह दरमहा ७,९१६ रुपये (२६२ रुपये प्रतिदिन) गुंतवावे लागतील. मॅच्युरिटीसाठी २५ वर्षांचा कालावधी निवडावा लागतो. अशा प्रकारे मॅच्युरिटीवर तुम्हाला 20 लाख रुपयांचा गॅरंटीड रिटर्न मिळू शकतो. मॅच्युरिटीपर्यंत पॉलिसी ठेवल्यावर तुम्हाला दोन बोनस मिळाले तर तुम्हाला 37 लाख रुपयांपर्यंतचा बोनस मिळू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: LIC Investment in Jeevan Labh Policy check details 02 June 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या