31 December 2024 4:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका Business Idea | गृहिणींसाठी कमी गुंतवणूक आणि जास्त नफा असलेले टॉप 4 व्यवसाय, आजपासूनच सुरुवात करा Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा - NSE: TATAPOWER NTPC Share Price | NTPC शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टम शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: APOLLO
x

LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल

LIC Scheme

LIC Scheme | भारत जीवन विमा निगम म्हणजेच LIC अंतर्गत वेगवेगळ्या पॉलिसी राबवल्या जातात. दरम्यान एलआयसी अंतर्गत महिलांसाठी देखील अत्यंत खास योजनांचा समावेश आहे. दरम्यान नुकतीच लॉन्च झालेली एलआयसीची ‘विमा सखी योजना’ महिलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. ही योजना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली असून योजनेचा एकमेव उद्देश म्हणजे भारताची प्रत्येक महिला दर महिन्याला पगार हातात घेऊ शकेल. या उद्देशाने लॉन्च करण्यात आली आहे.

वीमा सखी योजना :

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केलेल्या विमा सखी योजनेमध्ये एका वर्षातच 100,000 एवढ्या विमा सखी म्हणजेच महिला जोडल्या गेल्या पाहिजे.

2. एलआयसी विमा सखी योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा विचार देखील या योजनेचा आहे. त्याचबरोबर या योजनेचा आणखीन एक भाग म्हणजे इन्शुरन्स.

3. केवळ महिलांच्या सशक्तिकरणासाठीच नव्हे तर प्रत्येक महिला जागृत आणि स्वकमाई करू लागेल यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.

4. पॉलिसीमध्ये केवळ त्याच महिला सहभाग घेऊ शकतात ज्यांचं वय 18 ते 70 या वयोगटामध्ये बसत आहे. एवढेच नाही तर त्या महिलेचा शिक्षण निदान 10 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

5. सरकारने विमा सखी योजनेअंतर्गत तीन वर्षांत 200,000 एवढ्या महिलांना सूचीबद्ध करण्याचा निर्णय आहे.

योजनेची वैशिष्ट्ये :

1. या योजनेअंतर्ग काम करणाऱ्या सखीला एखादी पॉलिसी ग्राहकाला विकल्यानंतर त्यामधून कमिशन मिळणार.

2. महिलांच्या रोजगार संधीबद्दल सांगायचे झाले तर, एलआयसी अंतर्गत महिलांना 7000 रुपये सॅलरी मिळते. ज्यामुळे सर्वसामान्य महिला त्यांचा उदरनिर्वाह अगदी आरामात करू शकतात.

3. योजनेच्या दुसऱ्या वर्षी महिलांना 6000 रुपये सॅलरी मिळणार. त्याच्या पुढील वर्षाला त्यांना 5000 रुपये सॅलरी देण्यात येईल. समजा एखाद्या महिलेने तिला दिलेलं संपूर्ण टारगेट पूर्ण केलं तर तिला एक्स्ट्रा कमिशन देखील मिळणार.

4. ही योजना कशी चालते, ग्राहक कसे गोळा करायचे त्याचबरोबर योजनेबद्दलची संपूर्ण माहिती त्याचबरोबर ट्रेनिंग महिलांना दिली जाते. म्हणजेच त्यांना एका प्रकारचं फायनान्शिअल एज्युकेशन देण्यात येते.

अशा पद्धतीने अप्लाय करा :

तुम्हाला या योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि तिथेच अर्ज देखील करू शकता. यासाठी वयोमर्यादा 18 ते 50 या वयोगटातील असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करणाऱ्या महिलेजवळ 10 वी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत शहरापेक्षा ग्रामीण भागातील महिलांना अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | LIC Scheme Sunday 29 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

LIC scheme(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x