20 December 2024 8:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, मग ही फंडाची स्कीम पैशाचा पाऊस पाडेल, यापूर्वी 4346% परतावा दिला SBI Mutual Fund | बिनधास्त पैसे गुंतवा या SBI फंडाच्या योजनेत, पैसा अनेक पटीने वाढेल, सेव्ह करून ठेवा स्कीम डिटेल्स 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट IRFC Share Price | IRFC शेअर पुन्हा फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: IRFC Multibagger Stocks | श्रीमंत करतोय हा शेअर, गुंतवणूकदारांना 4000 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला - NSE: MUFIN Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी माझगाव डॉक सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, फायद्याची अपडेट- NSE: MAZDOC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा

Life Insurance Policy

Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्स हे एक प्रकारचे तुमचे पुढचे भवितव्य सुरक्षित करण्याचे साधन असते. नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी त्याचबरोबर आपल्या कुटुंबीयांसाठी लाइफ इन्शुरन्स घेतोच. लाइफ इन्शुरन्स हे एक प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट असते. जे इन्शुरन्स प्रोव्हायडर आणि इन्शुरन्स प्लॅन घेणाऱ्या व्यक्तीमध्ये केले जाते.

म्हणजेच काय तर, इन्शुरन्स घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला तर, त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत प्राप्त होते. ज्यामुळे त्यांचे जीवन एका जागी थांबून राहत नाही. योग्य आणि वेळोवेळी पैसे मिळाल्यामुळे त्यांची आर्थिक अडचण कमी होते. थोडक्यात काय तर इन्शुरन्स कंपनी पॉलिसीधारकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत प्रदान करते. परंतु लाईफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्समध्ये नेमका कोणता फरक जाणवतो हे जाणून घेऊया. तत्पूर्वी लाइफ इन्शुरन्सच्या प्रकारांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

टर्म लाइफ इन्शुरन्स प्लॅन :

हे एक अशा प्रकारचे इन्शुरन्स प्लॅन आहे जे एका निश्चित कालावधीसाठी घेतले जाते. यामध्ये तुम्ही निवडलेल्या वेळमर्यादेमध्येच रिस्क कव्हर दिले जाते. परंतु या टर्म लाईफ इन्शुरन्स प्लॅनमध्ये तुम्हाला मॅच्युरिटी बेनिफिट अनुभवायला मिळत नाही.

होल लाईफ इन्शुरन्स प्लॅन :

होल लाईफ इन्शुरन्स प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण जीवनभरासाठी इन्शुरन्स दिले जाते. यामध्ये पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याने केलेल्या नॉमिनीला संपूर्ण रक्कम मिळते.

मनी बँक :

मनी बँक या प्लॅनमध्ये देखील पॉलिसी धारकाला एका निश्चित वेळेपर्यंतच इन्शुरन्स पॉलिसी दिली जाते. यामध्ये तुम्हाला शेवटचा हप्ता तेव्हा मिळतो जेव्हा पॉलिसी पूर्णपणे संपून जाते.

युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन :

या इन्शुरन्स प्लॅनमध्ये केवळ इन्शुरन्स पॉलिसी नाही तर, सुरक्षितता देखील तितकीच शामिल आहे. या पॉलिसीमध्ये मिळणारा परतावा हा बाजारातील चढ उतारांवर आधारित असतो. यामध्ये पॉलिसीधारकाला म्युच्युअल फंडप्रमाणे युनिट देखील दिले जातात.

जनरल इन्शुरन्स आणि लाइफ इन्शुरन्समध्ये नेमका फरक काय :

जनरल इन्शुरन्स आणि लाइफ इन्शुरन्स दोन्हीही इन्शुरन्सचे फायदे पूर्णतः वेगवेगळ्या असतात. यामध्ये जनरल इन्शुरन्समध्ये पॉलिसीधारकाच्या आर्थिक अडचणींमध्ये मदत मिळते. काही व्यक्ती नॉन लाइफ इन्शुरन्स प्रोडक्टलाच जनरल इन्शुरन्स म्हणतात. जनरल इन्शुरन्समध्ये होम इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स त्याचबरोबर हेल्थ इन्शुरन्स देखील शामिल असते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Life Insurance Policy Friday 20 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Life insurance policy(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x