4 December 2024 2:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Investment Tips | असा वाढेल पैशाने पैसा, तुमच्याकडील पैसे पुन्हा होतील डबल; या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा - Marathi News Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IPO GMP | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केट'मध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल - GMP IPO 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगा'बाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SUZLON Horoscope Today | काहींचा सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढेल तर काहींना मिळेल यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, मजबूत कमाई होणार - NSE: HAL
x

Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News

Monthly Pension Money

Monthly Pension Money | निवृत्तीनंतर आपल्याला अडीअडचणीच्या काळात आणि प्रत्येक महिन्याला हातामध्ये आपली जमापुंजी असावी असं प्रत्येक नोकरीपेशा असलेल्या व्यक्तीला वाटतं असतं. कारण की सध्याची महागाई लक्षात घेता भविष्यामध्ये सर्व गोष्टींवर पैसा खर्च करण्यासाठी आपल्याजवळ ही तशी इन्कम असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपये एवढी पेन्शन मिळाली तर, तुमचे जीवन किती सोयीचे बनेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे शक्य कसं आहे. काळजी करू नका. पुढील बातमी सविस्तर वाचा.

आम्ही तुम्हाला एलआयसीच्या एका जीवन विमा बद्दल सांगणार आहोत. ही एक प्रकारची मंथली पेन्शन मनी आहे. एलआयसीच्या या जबरदस्त पॉलिसीचं नाव (LIC new Jeevan Shanti plan) असं या पॉलिसीचं नाव आहे. या पॉलिसीमध्ये तुम्हाला केवळ एकदाच पैसे गुंतवावे लागतील आणि मग तुम्हाला आयुष्यभर चांगल्या पैशांची पेन्शन सुरू राहील.

योजनेसाठी पात्र कोण :

तसं पाहायला गेलं तर कोणताही व्यक्ती या पॉलिसीसाठी पात्र आहे परंतु पॉलिसीधारकाचे वय 30 ते 79 या वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे. त्यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी की, तुम्ही जेवढ्या कमी वयात पॉलिसी घ्याल तितकीच कमी रक्कम तुम्हाला पेन्शनची मिळेल. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेऊन आणि योग्य वयाचा विचार करूनच पॉलिसीमध्ये पैसे गुंतवणे सुरू करा.

एवढी रक्कम गुंतवावी लागेल :

सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की, पॉलिसीसाठी एकूण दोन पर्याय दिले जातात. यामधील पहिल्या सिंगल लाईफकरिता डिफर्ड ॲन्युइटी आणि दुसऱ्या पर्यायाचे नाव आहे डिफर्ड ॲन्युइटी फॉर जॉईंट लाइफ. तर अशा पद्धतीचे हे दोन पर्याय तुमच्यासमोर दिले जातात. या पॉलिसीमध्ये तुम्ही किमान 1.50 लाखांची एक रक्कमी रक्कम गुंतवणे अनिवार्य आहे. जर एखाद्या व्यक्तीला जास्तीची रक्कम गुंतवायची असेल तर तो अगदी आरामात 1.50 लाखापेक्षा जास्त रक्कम गुंतवू शकतो.

पेन्शन सुरू होण्याची वेळ :

तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की, ही पॉलिसी तुम्हाला पेन्शन देणे सुरू कधी करणार तर, तुम्ही कोणत्याही वयाच्या 5 वर्षाआधी पॉलिसीमध्ये पैसे गुंतवले असतील तर, तुम्हाला बरोबर 5 वर्षानंतरच पेन्शन प्राप्ती होणे सुरू होईल. समजा एखाद्या व्यक्तीने वयाच्या 55 व्या वर्षी पॉलिसीमध्ये पैसे गुंतवले असतील तर त्याला वयाच्या 60 व्या वर्षापासून पेन्शन मिळणे सुरुवात होणार.

गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन समजून घ्या :

गुंतवणुकीचे कॅल्क्युलेशन अतिशय सोपे आहे. समजा तुम्ही वयाच्या 55 व्या वर्षी पॉलिसीचा सिंगल प्रीमियम प्लॅन खरेदी केला असेल तर, बरोबर वयाच्या 60 व्या वर्षी तुम्हाला पेन्शन सुरू होणार. तुम्हाला साठाव्या वर्षी पेन्शन स्वरूपात प्रत्येक महिन्याला एकूण 1,02,850 रुपये मिळतील. पॉलिसीची खास गोष्ट म्हणजे तुम्ही प्रत्येक महिन्याला किंवा 2, 3 आणि 6 महिन्यानंतर लाखोंच्या संख्येत पेन्शन काढून घेऊ शकता. वरील संपूर्ण कॅल्क्युलेशन हे 11 लाखांच्या गुंतवणुकीचं आहे. म्हणजेच तुम्हाला एकूण 11 लाखांची एक रक्कम रक्कम गुंतवावी लागणार आहे.

पॉलिसीचे फायदे :

1. या भन्नाट पॉलिसीमध्ये तुम्हाला आश्चर्यचकित कायद्यांचा अनुभव घेता येणार आहे. समजा पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर, संपूर्ण रक्कम केलेल्या नॉमिनीला व्याजासकट मिळते.
2. त्याचबरोबर ही पॉलिसी तुम्ही कधीही सरेंडर करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे इतर पॉलिसींपेक्षा या पॉलिसीची सरेंडर व्हॅल्यू थोडी जास्त आहे.
3. पॉलिसीबद्दल आणखी एक भन्नाट गोष्ट म्हणजे तुम्हाला यामध्ये कर्जाची हमीदेखील मिळते. योजनेच्या केवळ 3 महिन्यानंतर तुम्हाला पॉलिसीमधून कर्ज घेण्याची संधी मिळते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Monthly Pension Money 13 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Monthly Pension Money(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x