13 January 2025 7:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल Home Loan Prepayment | गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडताय, प्री-पेमेंट करण्यापूर्वी जाणून घ्या पेनल्टी चार्जेस किती भरावे लागतील
x

Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन

Monthly Pension Scheme

Monthly Pension Scheme | प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात रिटायरमेंट प्राप्त करतो. वयाची साठी ओलांडली की, शरीर साथ देत नाही. शरीर थकल्यामुळे कोणताही व्यक्ती मेहनतीचं काम करून पैसे कमवू शकत नाही. त्यामुळे नोकरीला असतानाच तुम्ही गुंतवणुकीचे मार्ग शोधून रिटायरमेंटसाठी निधी जमा करायला हवा. तुम्ही नुकतेच नोकरीला लागला असाल आणि रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं असेल तर, तुमच्यासाठी एलआयसीची सरल पेन्शन योजना अत्यंत फायद्याचे ठरू शकते.

एलआयसी कार्पोरेशन अंतर्गत चालवली जाणारी एलआयसी सरल पेन्शन योजना नोकर वर्गासाठी अत्यंत फायद्याची ठरू शकते. कारण की यामध्ये तुम्हाला एकरक्कमी पैसा गुंतवता येणार आहे. या एकरक्कमी गुंतवलेल्या पैशातून तुम्ही प्रत्येक महिन्याला तब्बल 12000 रुपयांची पेन्शन स्वरूपात कमाई करू शकता. जेणेकरून तुमचा रिटायरमेंटनंतरचा काळ सुसह्य होईल.

जाणून घ्या सरल पेन्शन योजनेची संपूर्ण माहिती :

एलआयसीची सरल पेन्शन योजना एक प्रकारची नॉन-लिंक्ड योजना आहे. म्हणजेच या योजनेमध्ये तुम्ही एक रक्कम पैसे गुंतवून अधिक नफा कमवू शकता. सरल पेन्शन योजनेमध्ये वयोमर्यादा कमीत कमी 40 ते जास्तीत जास्त 80 गिली गेली आहे. या योजनेमध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीही लिमिट दिली गेली नाहीये त्यामुळे तुम्ही तुम्हाला हवे तेवढे पैसे गुंतवू शकता.

अशा पद्धतीने घेऊ शकता पेन्शन :

तुम्ही एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेची पेन्शन महिन्याला, तिमाही किंवा सहामाही आधारावर घेऊ शकता. एका महिन्यासाठी पेन्शन 1000 रुपये आहे. 3 महिन्यांसाठी 3000, 6 महिन्यांसाठी 6000 तर, संपूर्ण वर्षभरासाठी 12,000 रुपये पेन्शन देण्यात येणार.

12,000 पेन्शन मिळवण्यासाठी गुंतवणूक कशी कराल :

रिटायरमेंटनंतर तुम्हाला 12000 रुपये पेन्शन हवी असेल तर, तुम्ही 42 वयाचे असतानाच 30 लाख रुपयांची एन्यूईटी खरेदी करावी लागणार आहे. 30 लाखांच्या एन्यूईटीवर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 12388 रुपयांची पेन्शन प्राप्त होईल. समजा तुम्हाला यापेक्षा अधिक इन्कम हवी असेल तर, तुम्हाला गुंतवताना अधिक पैसे गुंतवावे लागतील.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Monthly Pension Scheme Wednesday 11 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Monthly Pension Scheme(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x