16 November 2024 11:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | शेअरची रॉकेट तेजी वाढणार, जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत अजून एक अपडेट - NSE: JIOFIN Penny Stocks | 67 पैशाच्या शेअरवर तुटून पडले गुंतवणूकदार, चिल्लर गुंतवणूक नशीब बदलू शकते - Penny Stocks 2024 Mutual Fund SIP | केवळ 10 हजाराची SIP बचत देईल 3.5 करोड रुपये परतावा, असा पैशाने पैसा वाढवा - Marathi News Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024 Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFOSYS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL
x

Post Office Insurance | सामान्य लोकांसाठी पोस्ट ऑफिसची ढासू स्कीम; 10 लाखांचा विमा फक्त 555 रुपयांत - Marathi News

Post Office Insurance

Post Office Insurance | अपघाती मृत्यू होणाऱ्या नागरिकांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने नुकतीच एक नवीन स्किम सुरू केली आहे. या स्किममध्ये अगदी सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल अशी प्रीमियमची रक्कम ठेवण्यात आली आहे. पोस्ट ऑफिसची आरोग्य आणि विमाधारकवर आधारित असलेली ही स्कीम तुमच्यासाठी अत्यंत फायद्याची ठरणार आहे.

हेल्थ प्लस आणि हेल्थ एक्सप्रेस अशी नावं या स्कीमची असून नुकतेच IPPB ने सर्वसामान्यांना परवडणाऱ्या प्रीमियममध्ये नवीन पर्सनल ॲक्सीडेंट कव्हर सादर केले आहेत. यांची पॉलिसी कालावधी एक वर्षांची असून 18 ते 65 वयोगटातील कोणत्याही व्यक्ती या पॉलिसीची निवड करू शकतात. सादर केलेलं कव्हर अपघातामुळे झालेला मृत्यू, वैद्यकीय खर्च आणि अपंगत्व या गंभीर कारणांसाठी आर्थिक संरक्षण प्रदान करण्याचे काम ही पॉलिसी करणार आहे.

हेल्थ प्लस ऑप्शनचे हे तीन फीचर्स जाणून घ्या :
हेल्थ प्लस ऑप्शनमध्ये एकूण तीन फीचर्स दिले गेले आहेत. यामधील पहिल्या फीचरमध्ये व्यक्तीला अपंगत्व आल्यास किंवा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत केली जाणार आहे.

हेल्थ प्लस ऑप्शन 1 :
हेल्थ प्लस ऑप्शन 1 मध्ये एक वर्षाच्या प्रीमियमची रक्कम फक्त 355 रूपये असून, यामध्ये पाच लाखांची विमा रक्कम दिली जाते. वैयक्तिक अपंगत्व किंवा व्यक्तीचा मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या कुटुंबीयांना विमामधली 100% टक्के रक्कम मिळणार आहे. दरम्यान पॉलिसीमधील अटिंनुसार विमाधारक फ्रॅक्चर झाला तर त्याला 25,000 आणि मुलांच्या लग्नासाठी 50,000 रुपयांपर्यंत विमा रक्कम मिळणार आहे.

हेल्थ प्लस ऑप्शन 2 :
हेल्थ प्लस ऑप्शन 2 मध्ये विमाधारकाला 10 लाखांपर्यंत विमा रक्कम मिळणार आहे. तसेच पॉलिसीमधील अटी लक्षात घेता फ्रॅक्चर झाल्यावर 25000 रुपयांची रक्कम मिळणार आहे. 2 नंबरच्या हेल्थ प्लस ऑप्शनचा प्रीमियम काळ दोन वर्षांपर्यंत असून त्याचा कर 555 रुपये आहे. दरम्यान विमाधारकाला अचानक अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना विमा रकमेची 100% रक्कम देण्यात येणार आहे.

हेल्थ प्लस ऑप्शन 3 :
हेल्थ प्लस ऑप्शन 3 च्या वार्षिक प्रीमियमचा कर 755 रुपये असून. व्यक्तीला 15 लाख रुपयांचं विमा संरक्षण देण्यात येते. यामध्ये देखील वैयक्तिक अपंगत्व किंवा व्यक्तीचा मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या कुटुंबीयांना विम्याची 100 % अमाऊंट मिळणार. सोबतच अटीनुसार विमाधारक फ्रॅक्चर झाल्यास 25 हजार रुपये आणि मुलांच्या लग्नासाठी एक लाख रुपयांपर्यंतचं वीमा संरक्षण मिळतं.

एक्सप्रेस हेल्थ प्लॅन :
एक्सप्रेस हेल्थ प्लॅनमध्ये विमाधारकाला वार्षिक आरोग्य तपासणी, टेलीकन्सल्टेशन आणि इतर फायद्यांचा लाभ घेता येणार आहे. परंतु या अजून योजनेची सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नाहीये त्यामुळे ॲक्सीडेंट संरक्षणाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन भेट द्या.

Latest Marathi News | Post Office Insurance Scheme 08 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Post Office Insurance(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x