17 November 2024 4:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | नवीन IPO आला रे, एकाच दिवसात पैसे दुप्पट होणार, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, रोज अप्पर सर्किट हिट, 1 वर्षात 516% परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, जेफरीज ब्रोकरेज फर्मचा खरेदीचा सल्ला - NSE:HAL Money Formula 12x30x12 | हा एक फॉर्मुला बनवेल करोडपती, योजनेत गुंतवा केवळ 1000 रुपये, कमवा पैसाच पैसा - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रेटिंग अपग्रेड, शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
x

Bangladesh Crisis | श्रीलंका नंतर आता महागाईमुळे बांगलादेशची जनता सरकारविरोधात रस्त्यावर, सरकार हादरलं

Bangladesh Crisis

Bangladesh Crisis | श्रीलंकेनंतर भारताचा आणखी एक शेजारी देश बांगलादेशवर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. बांगलादेशात डिझेल आणि पेट्रोलच्या दरात जवळपास 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ जाहीर होताच बांगलादेशातील पेट्रोल पंपांवर हजारोंच्या संख्येने रांगा लागल्या. बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज पेट्रोल-डिझेल सर्वाधिक महाग होत आहे. पेट्रोल १३० टके आणि डिझेल ११४ टके प्रतिलिटर मिळत आहे. बांगलादेशातील महागाईने उच्चांकी 7.56% गाठली आहे.

परकीय चलन साठ्यात सातत्याने घट :
बांगलादेशच्या परकीय चलन साठ्यात सातत्याने घट होत आहे. महागाई शिगेला पोहोचली आहे. बांगलादेश सरकार आता आयएमएफकडे कर्ज मागत आहे. पण या दरम्यान बांगलादेशने एक पाऊल उचललं आहे, ज्यामुळे महागाई वाढून निर्णय घेतला जाईल असं मानलं जातंय. बांगलादेशने एकाच वेळी पेट्रोलच्या दरात ५१.७ टक्के वाढ केली आहे.

बांगलादेश मुक्तीनंतरची सर्वाधिक महागाई :
पेट्रोलच्या दरात झालेली ही वाढ १९७१ मध्ये बांगलादेश मुक्तीनंतरची सर्वाधिक आहे. पेट्रोलच्या दरात प्रचंड वाढ झाल्यानंतर जनक्षोभ उसळला आहे. लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोंमध्ये तेल दरवाढ जाहीर झाल्यानंतर लगेचच हजारो लोकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक जण आपापल्या गाड्या भरून घेत होता. या काळात अनेक ठिकाणच्या पेट्रोल पंपांनी फायदा घेत घोषणा झाल्यानंतर लगेचच पंप बंद केला. वाढलेल्या किमतींच्या आधारे रात्री बारानंतर पेट्रोलपंप पुन्हा सुरू झाला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bangladesh Crisis over inflation check details 07 August 2022.

हॅशटॅग्स

#Bangladesh Crisis(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x