17 April 2025 1:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा
x

ब्रेकिंग न्यूज! बांगलादेशमध्ये EVM मशीन बंदी जाहीर, तांत्रिक 'लूप-होल'चा दुरूपयोग करून सरकार स्थापित होतं असल्याचं आरोप झाला होता

Bangladesh Election Commission

EVM Machines Banned in Bangladesh | बांगलादेश निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनऐवजी (ईव्हीएम) ३०० खासदार निवडीसाठी पेपर बॅलेट पेपरचा वापर केला जाणार असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले आहे.

बांगलादेश निवडणूक आयोगाचे अध्यक्ष काझी हबीबुल अवाल यांनी ढाका येथील निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले की, ईव्हीएमवर राजकीय सहमती नसल्यामुळे तसेच प्रचंड निधी गरजेचा असल्याने निवडणूक आयोगाने केवळ मतपत्रिकेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेश सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा बचाव करणाऱ्या बांगलादेश निवडणूक आयोगाने प्रस्तावित केलेल्या ईव्हीएमबाबत बहुतांश राजकीय पक्षांनी शंका, अविश्वास आणि साशंकता व्यक्त केली असून त्यात घोटाळा होऊ शकत नाही, असा दावा सत्ताधारी अवामी लीगनेही केला होता. मात्र दुसरीकडे काहीही झालं तरी शेवटी ते मशीन आहे आणि जगातील कोणतही मशीन हे तांत्रिकदृष्ट्या १००% सुरक्षित असू शकत नाही असं तंत्रज्ञान तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं होतं. या मशीनमधील ‘लूप होल’ हे निर्मात्यांना आणि तंत्रज्ञान तज्ज्ञांना माहिती असतात, त्यामुळे जर एखाद्या सत्ताधाऱ्यांना तो तांत्रिक ‘लूप-होल’ अवगत झाला तर मतदाराच्या मतदारानाला काहीही किंमत उरणार नाही असा दाट संशय तंत्रज्ञान तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यानंतर बांगलादेश मधील विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

EVM घोटाळे आणि विरोधक आक्रमक
दरम्यान, पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष असलेल्या अवामी लीग विरोधात गेल्या काही आठवड्यांपासून निदर्शने सुरू आहेत. विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर मागील निवडणुकीत EVM तांत्रिक ‘लूप-होल’चा दुरूपयोग करून घोटाळा केल्याचा आरोप केला होता, आणखी EVM घोटाळे टाळण्यासाठी निःपक्षपाती सरकार स्थापन करण्याची मागणी केली होती. त्याला सरकारने दडपशाहीने प्रत्युत्तर दिले आहे, निदर्शनांवर बंदी घातली आहे आणि इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना तुरुंगात डांबले आहे.

तांत्रिक ‘लूप-होल’चा दुरूपयोग :
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्समधील तांत्रिक ‘लूप-होल’ एखाद्या सत्ताधारी पक्षाला समजला तर सरसकट संशयाचं वातावरण निर्माण होऊ नये म्हणून सत्तेत येण्यासाठी किंवा सत्तेत कायम राहण्यासाठी गरजेच्या जागांची संख्या या तांत्रिक ‘लूप-होल’चा दुरूपयोग करून निवडून आणल्या जाऊ शकतात. तसेच ज्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांची प्रशासनावर पकड असेल तेथे या तांत्रिक ‘लूप-होल’चा दुरूपयोग सहज शक्य असल्याचं तंत्रज्ञान तज्ज्ञांनी म्हटले होते.

प्रगत देशांमध्ये ईव्हीएमवर बंदी
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. भारतात खुद्द भाजपने देखील मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी ईव्हीएम बंदीची मागणी केली होती, पण मोदी सरकार सत्तेत आलं आणि हा विषय गुंडाळण्यात आला आहे. मात्र त्यानंतर खुद्द भारतीय निवडणूक आयोगाचं चर्चेचा विषय बनला आहे. इतरही अनेक देश आहेत जिथे ईव्हीएमवर बंदी आहे. यामध्ये इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स आणि अमेरिका या प्रगत देशांचा समावेश आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Bangladesh Election Commission rejects electronic voting check details on 06 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bangladesh Election Commission(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या