कोरोनामुळे जगभरात 1 कोटी 77 लाख लोकांचा मृत्यू, हेल्थ मॅगझिन लॅन्सेटचा रिपोर्ट, सण-उत्सवाच्या नावाने धार्मिक मार्केटिंग करणाऱ्यांना चपराक?
Lancet Report | मागील २ महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात शिंदेंनी शिवसेनेत केलेल्या बंडखोरीनंतर राज्यात नवीन सरकार आलं. तत्पूर्वी, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर जगभरात कोविड १९ ने डोकं वर काढलं आणि भारतासहित जगभरात सामान्य लोकांच्या मृत्यूचं तांडव सुरु झालं. भारतातही केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यानंतर जवळपास दीड-दोन वर्ष ही केंद्र सरकारच्या आणि आयसीएमआरच्या सल्ल्यांप्रमाणे गाईडलाईन्स राज्यांवर बंधनकारक करण्यात आल्या होत्या. अनेक महिने परिसस्थिती चिंताजनक होती. अगदी आजपर्यंत कोविड पेशंट मिळत असून त्यात काहींचा आजही मृत्यू होतोय हे वास्तव आहे.
मात्र मागील महिनाभरात सुरु झालेल्या उत्सवाच्या दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धार्मिक राजकीय मार्केटिंगच्या नादात मागचा काळ जणू दुसऱ्या सरकारच्या जुलूमशाहीत गेला असे अत्यंत असंवेदनशील संदेश देताना दिसत आहेत. एकूण रोज शेकडो लोकं मृत्युमुखी पडत होते तरी उत्सव साजरे करायला हवे असं त्यांना सांगायचं आहे का असा गंभीर प्रश्न निर्माण होतोय. मात्र आता लॅन्सेट’ या हेल्थ मॅगझिनने प्रसिद्ध केलेल्या अहवालात जगभरात आणि देशात परिस्थिती किती गंभीर होती याचं वास्तव समोर आलं आहे.
अहवाल ‘लॅन्सेट’ या हेल्थ मॅगझिनने प्रसिद्ध केला :
गेल्या दोन वर्षांत जगात हाहाकार माजवणाऱ्या कोविड १९ विषाणूबाबतचा नवा अहवाल ‘लॅन्सेट’ या हेल्थ मॅगझिनने प्रसिद्ध केला आहे. या अहवालात, लॅन्सेटने कोविडमुळे झालेल्या बहुतेक मृत्यूंसाठी निष्काळजीपणाला जबाबदार धरले आहे. कोविडमुळे मृत्यू झालेल्या लाखो लोकांना वाचवता आलं असतं, असा दावा लॅन्सेटने केला आहे. जगभरात कोविड-१९ शी व्यवहार करताना अनेक पातळ्यांवर निष्काळजीपणा आणि गैरव्यवस्थापन झाले, ज्यामुळे लाखो लोक ज्यांचे प्राण वाचू शकले असते, असे लॅन्सेटने अहवालात म्हटले आहे.
कोविड-19 दरम्यान, अंदाजे 1 कोटी 77 लाख लोकांचा मृत्यू :
या अहवालासाठी लॅन्सेटने जगभरातील कोविड-19 चा सामना करण्यासाठी गेल्या दोन वर्षात उचललेल्या पावलांचा सखोल आढावा घेतला आहे. या अहवालात कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना, पारदर्शकता, जनजागृती, मूलभूत सार्वजनिक आरोग्य यंत्रणा, मोहिमेतील सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय एकता यांचे व्यापक अपयश याबद्दल उघडपणे भाष्य करण्यात आले आहे. कोविड 19 मुळे सुमारे 1 कोटी 77 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
कोविड 19 च्या धोक्यावर अनेक देश तयार नव्हते :
लॅन्सेटने अहवालात दावा केला आहे की, “कोविड १९ च्या धोक्याचा सामना करण्यासाठी बहुतेक देशांची सरकारे तयार नव्हती. कोव्हिडच्या धोक्याला मिळणारा प्रतिसाद अतिशय संथ होता. त्याचबरोबर समाजातील अतिसंवेदनशील गटांकडे तुलनेने फारसे लक्ष दिले गेले नाही. आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि चुकीच्या माहितीच्या अभावामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली,” असे सांगून लॅन्सेटने म्हटले आहे की, नवीन महामारी आणि आर्थिक विश्लेषणाचा वापर करून काही शिफारसी केल्या आहेत. या शिफारशींचा अवलंब केल्यास कोव्हिड-१९ सारख्या विषाणूंचा सामना करणे, भविष्यातील संभाव्य आरोग्यविषयक धोके कमी करणे आणि दीर्घकालीन शाश्वत वाढ साध्य करणे यासाठी मोठी मदत होऊ शकते. या अहवालात म्हटले आहे की, ही उद्दीष्टे साध्य करण्याची शक्यता मजबूत परस्पर सहकार्यावर अवलंबून आहे, जी जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) सुधारण्यावर आणि बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Covid 19 Response Led To Millions Of Preventable Deaths check details 16 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC