महत्वाच्या बातम्या
-
Inflation Alert | देशात आधीच महागाईने होरपळनाऱ्या जनतेला अजून एक धक्का, महागाई आणखी वाढण्याचे आयएमएफ'चे संकेत
Inflation Alert | भारतातील जनता आधीच प्रचंड महागाईत होरपळत असताना आता आयएमएफ’ने जागतिक स्तरावरील आर्थिक संकेतावर भाष्य केल्याने महागाई या विषयवार चिंता वाढण्याची शक्यता आहे असं म्हटलं जातंय. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) प्रमुख क्रिस्तिलिना जॉर्जिवा यांनी जागतिक स्तरावरील आर्थिक स्थितीवर सविस्तर भाष्य केलं आहे. सीएनबीसी-टीव्ही 18 ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्या म्हणाल्या की, 2023 मध्ये, जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल पुन्हा शंका कायम आहेत. जॉर्जिवाने सीएनबीसी-टीव्ही १८ ला सांगितले की, व्याजदरात वाढ झाली असली तरी २०२३ मध्ये आम्हाला दिलासा मिळेल की नाही याचा अंदाज बांधणे घाईचे आहे. कोरोना महामारीतून बाहेर पडल्यानंतर रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जगभरात महागाई वाढली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Asia Cup 2022 | भारत पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामना, दर 10 सेकंदाला किती पैसे कमाई होणार जाणून घ्या
Asia Cup 2022 | आशिया कप 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ फेव्हरिट आहेत. गेल्यावेळी भारताच्या खेळाडूंनी दडपण चांगलेच हाताळून अखेरच्या षटकात सामना जिंकला होता. आज दुहेरी उत्साहाच्या मैदानात उतरणार पाकिस्तान . कारण त्याने हाँगकाँगचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Twitter Edit Button | ट्विटरवर लवकरच एडिट बटण फीचर येणार, एडिट करण्यासाठी किती वेळ मिळणार पहा
Twitter Edit Button | मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने आपल्या एडिट बटण फीचरबाबत मोठी माहिती दिली आहे. सध्या एडिट बटन फीचरची चाचणी घेण्यात येत असून लवकरच ती युजर्ससाठी आणली जाईल, असे ट्विटरने म्हटले आहे. या नव्या फीचरअंतर्गत युजर्संना 30 मिनिटांच्या आत आपले ट्विट एडिट करता येणार आहे. ट्विटरने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, एडिट ट्विट फीचर सध्या काम करत आहे. याची प्रथम एका छोट्या ग्रुपद्वारे चाचणी केली जाईल आणि येत्या आठवड्यात ट्विटर ब्लू सब्सक्राइबर्सचा या चाचणीत समावेश केला जाईल. ट्विटर ब्लू कंपनीने दिलेली पेड सबस्क्रिप्शन ऑफर आहे.
2 वर्षांपूर्वी -
Pakistan Economic Crisis | पाकिस्तानात टोमॅटो 500 रुपये किलो, कांदा 400 रुपये किलो, बटाटे 120 रुपये किलो, अर्थव्यवस्था संकटात
Pakistan Economic Crisis | लाहोर आणि पंजाब प्रांतातील अन्य भागात आलेल्या प्रलयंकारी पुरामुळे विविध भाज्या आणि फळांच्या किंमतीत मोठी वाढ होत असताना पाकिस्तान सरकार भारतातून टोमॅटो आणि कांदा आयात करण्याची शक्यता आहे. बाजारातील घाऊक व्यापाऱ्यांनी ही माहिती दिली.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | त्याला आगीशी खेळ नडला, चेहऱ्यालाच आग लागली आणि पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पहा व्हायरल व्हिडिओ
Viral Video | अग्नीशी खेळणे हे मृत्यूशी खेळण्यासारखे मानले जाते आणि ती सर्वश्रुत धोकादायक गोष्ट मानली जाते. त्यामुळेच आग संबंधित असे अनेक अपघात घडतात. एक ठिणगी अख्खं जंगल राख करू शकते, असं तुम्ही ऐकलं असेलच, त्यामुळे आग या विषयाशी स्टंट करणं किती धोकादायक ठरू शकते याची कल्पना करा. असाच एक सीन या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. एक व्यक्ती लोकांना आग संबधित खेळ करून दाखवत होता. तो तोंडात पेट्रोल भरतो आणि मग तोंडातून ते सोडून आगीचा खेळ दाखवतो. त्याचं शौर्य काही वेळापुरतं ठीक होतं, पण लगेच त्याच्या दाढीला आग लागते. बघता बघता संपूर्ण चेहऱ्यावर आग लागते.
2 वर्षांपूर्वी -
Bangladesh Economic Crisis | भीषण महागाईने बांगलादेशात आर्थिक संकट गहिरे झाले, श्रीलंकेच्या दिशेने वाटचाल
Bangladesh Economic Crisis | बांगलादेशातील महागाई आणि जीवनावश्यक गोष्टींचा अभाव याविरोधातील जनतेचा रोष आता रस्त्यावर दिसू लागला आहे. गुरुवारी देशातील डाव्या विचारांच्या संघटनांनी सर्वसाधारण संपाचं आयोजन केलं होतं. डाव्या लोकशाही आघाडीने (एलडीए) पुकारलेल्या संपादरम्यान विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. एलडीएशी संबंधित अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
2 वर्षांपूर्वी -
भारताची लोकसंख्या 141 कोटी, त्यातील 2126 लोकांनी ऑनलाईन ठरवलं की मोदी हे जगातील लोकप्रिय नेते, नेटिझन्सच्या 2126 भक्तांवर टिपण्या
PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील लोकप्रिय नेता ठरले आहेत. मोदी नेहमी आपल्या वेगवेगळ्या वेषभूषेसाठी चर्चेत असतात. त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांचे दौरे या सगळ्यासाठी त्यांची जगभरात चर्चा होत असते. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही मागे टाकलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | भारतीयांनो, चीन अरुणाचल प्रदेशात घुसून बांधकाम करू लागला, स्थानिक रहिवाशांनी दिली माध्यमांना माहिती, व्हिडिओ पहा
Video Viral Chinese construction work in Arunachal Pradesh | अरुणाचल प्रदेशच्या अंजाव जिल्ह्यातील स्थानिक भारतीय रहिवाशांनी एका महत्त्वाच्या घडामोडीत, छगलगाममधील हादिगरा-डेल्टा 6 जवळ चीन पीएलए (पीपल्स रिपब्लिक आर्मी) जवान बांधकाम करत असलेल्या मशीनरीचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत. इंडिया टुडेच्या सूत्रांनी पुष्टी केली की एखाद्या व्यक्तीस या ठिकाणी पोहोचण्यासाठी साधारणत: चार दिवस लागतात आणि एलएसी (प्रत्यक्ष नियंत्रण रेषा) जवळील जिल्ह्यातील छगलगम हे शेवटचे प्रशासकीय पोस्ट आहे असाही समोर आलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
Starlink V2 | पुढील वर्षी स्टारलिंक व्ही-2 लाँच झाल्यावर उपग्रहांच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात मोबाइल नेटवर्कपर्यंत पोहोचणार
Starlink V2 | इलॉन मस्क यांनी आपल्या स्टारलिंक या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत नवी घोषणा केली आहे. पुढील वर्षापर्यंत स्टारलिंक व्ही २ लाँच करणार असल्याचे मस्क यांनी ट्विट केले आहे. हे थेट मोबाइल फोनला नेटवर्क प्रदान करेल. या माध्यमातून आपण जगातील डेड झोनमधील मोबाइल नेटवर्कपर्यंतही पोहोचू. म्हणजेच जगाच्या कानाकोपऱ्यात आता मोबाइल नेटवर्कची सुविधा उपलब्ध होणार आहे. मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले आहे की, आम्ही प्रति सेल झोन २ ते ४ एमबिट्सची कनेक्टिव्हिटी प्रदान करू. हे व्हॉईस कॉल आणि मजकूर संदेशांसाठी चांगले कार्य करेल परंतु ते उच्च बँडविड्थसाठी असणार नाही.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | ती पिस्तूल दाखवून स्टंट व्हिडिओ बनवत होती, डोक्याजवळ बुलेट फायर झाली, हादरवून टाकणारा व्हिडिओ व्हायरल
Viral Video | आजच्या तरुणाईमध्ये लाइक्स मिळवण्याची इतकी क्रेझ आहे की, त्यासाठी ते जोवघेणे प्रकार करतात. सोशल मीडियावर कूल ड्यूड बनण्यासाठी लोक काहीही करत असतात. मात्र, अशा लोकांच्या डोक्यात इतकी जास्त हवा जाते की कधी कधी ते स्वतःच स्वतःच्या जीवाशी खेळून जातात. आणि असा भीषण प्रकार घडतो की त्याची कल्पनाही करता येत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इतका खतरनाक आहे की, तो पाहिल्यानंतर तुम्हीही क्षणभर स्तब्ध व्हाल.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | बिकिनी बेब्समध्ये लेहंगा-चुनरी घालून फिरताना दिसली भारतीय महिला, नेटिझन्सकडून सॅल्यूट, व्हिडिओ व्हायरल
सुट्टीत गेल्यावर आम्ही समुद्रकिनाऱ्याच्या बाजूची खास तयारी करतो. आमच्या किटमध्ये सहसा सन ग्लास, सन स्क्रीन आणि रंगीबेरंगी पोहण्याचे पोशाख यासारख्या गोष्टी असतात, परंतु ही यादी प्रत्येकासाठी समान नसते. यावेळी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून हे सांगता येईल. या मॅडमनी क्षणभरही विचार केला नाही की, त्या वेळेनुसार आपला ड्रेस थोडा वेगळा असू शकेल. ती बिनधास्त समुद्रकिनाऱ्यावर फिरताना दिसली आणि प्रत्येकजण तिच्या सामान्य शैलीचे आणि स्वॅगचे कौतुक करीत आहे. त्याचबरोबर काही लोक असेही म्हणत आहेत की, काकी चुकीच्या कपड्यांमध्ये चुकीच्या ठिकाणी पोहोचली.
2 वर्षांपूर्वी -
Inflation Effect | वाढत्या महागाईने या देशातील अनेक महिलांवर देहव्यापाराची वेळ, घरातील कुत्रा-मांजरांना खाणं देणं अशक्य
ब्रिटनमधील वाढत्या महागाईमुळे अनेक महिलांना देहव्यापाराला भाग पाडले जात आहे. वेश्याव्यवसायातून पैसे मिळावे यासाठी घरांमधून बाहेर पडून थेट रस्त्यावर अनेक महिला जाणं पसंत करत आहेत. इंग्लिश कलेक्टिव्ह ऑफ प्रॉस्टिट्यूट नावाच्या संस्थेच्या अहवालात हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. महिलांना या व्यवसायातून बाहेर काढण्याचे काम ही संस्था करते.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | टायमिंगची गडबड झाली राव, थेट मुलाखतीत बॅग उचलताना चोर कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
एका लाईव्ह टीव्ही मुलाखतीदरम्यान हा चोरटा मधोमध एका व्यक्तीची बॅग चोरताना कॅमेऱ्यात कैद झाला. दिवसाढवळ्या घडलेली ही घटना बार्सेलोना या टुरिस्ट सिटीतील असल्याचं बोललं जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहितीनुसार, या व्हिडिओच्या मदतीने पोलिसांनी चोराला पकडून तुरुंगात डांबले.
2 वर्षांपूर्वी -
Drink More Wine | जपानचं काही भलतंच, तरुणांमध्ये दारूचं व्यसन कमी होतं असल्याने त्रस्त, कारण वाचून कपाळावर हात माराल
जपानची तरुण पिढी त्यांच्या आधीच्या पिढीपेक्षा कमी दारू पित आहे, त्यामुळे आता हा ट्रेंड उलटता यावा म्हणून नॅशनल टॅक्स एजन्सी स्पर्धा आयोजित करत आहे. महसूल संकलनात घट झाल्यामुळे जपानी सरकारने देशात आपला खप वाढवण्यासाठी तरुणांना कल्पना मागवल्या आहेत. जपानच्या नॅशनल टॅक्स एजन्सीने ‘साके व्हिवा’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये सेक, शोचू, अवामोरी, बिअर यांसारख्या मद्यपी उत्पादनांना प्रोत्साहन देता यावे, यासाठी तरुणांना आपले बिझनेस प्लॅन सादर करावे लागतात.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | मेट्रो ट्रेनमध्ये उंदीर चढला, प्रवाशांची पळापळ आणि अनेकांचे पाय वरती, व्हिडिओ प्रचंड व्हायरल
सोशल मीडियावर अनेकदा अशा गोष्टी पाहायला मिळतात, ज्या पाहून डोळ्यांवर विश्वास ठेवणं खूप कठीण जातं. तसं पाहिलं तर छोट्या उंदराबद्दल बोलायचे झाल्यास हा लहानसा जीव अनेक ठिकाणी दिसतो. अनेक वेळा उंदीर लोकांच्या घरांमध्ये दहशत निर्माण करू लागतात आणि ते रेल्वे स्थानकांच्या आसपासही दिसतात, पण मेट्रो ट्रेनमध्ये उंदीर दहशत निर्माण करताना तुम्ही कधी पाहिले आहेत का?
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | या देशात महागाईमुळे पंतप्रधानाच्या विरोधात 'चप्पल मार मशीन'चा वापर, नेटिझन्सकडून संशोधकाचं कौतुक
शेजारच्या पाकिस्तानबद्दल असे म्हटले जाते की, राजकीय विरोध हा येथे झोपणे, बसणे किंवा खाणे-पिणे यांइतकाच सामान्य आहे. त्याच्याशी संबंधित सर्व प्रकारचे व्हिडिओही समोर येत असतात. यातील काही व्हिडिओ खूप आश्चर्यकारक असतात आणि काही इतके आश्चर्यकारक असतात की ते पाहून लोक प्रचंड हसतात. आता असाच आणखी एक व्हिडिओ पाकिस्तानातून समोर आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | जगातील सर्वात तरुण फिनलँडच्या महिला पंतप्रधान सना मरिन यांचा पार्टीत दारू पिऊन गोंधळ, व्हिडिओ व्हायरल
फिनलंडच्या पंतप्रधान सना मरिन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती दारू पिताना आणि मैत्रिणींसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही क्लिप मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. इकडे हा व्हिडिओ लीक झाल्यानंतर सना विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आली आहे. पंतप्रधान सना मरिन यांनी मित्रांसह ड्रग्जचे सेवन केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
अमेरिकेतील वृत्तपत्रामध्ये दिल्लीच्या शिक्षण मॉडेलचे कौतुक, दुसरीकडे दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सीबीआय छापे
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यास सुरुवात केल्यानंतर काही वेळातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवरून ‘जग दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्य मॉडेलबद्दल बोलत आहे’, म्हणून ही कारवाई केली जात असल्याचा आरोप केला. केजरीवाल यांनी न्यूयॉर्क टाइम्सच्या (एनवायटी) पहिल्या पानाचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे, ज्यात दिल्लीतील एका शाळेचा आणि सिसोदियायांचा फोटो होता, ज्यात त्यांनी म्हटले होते की , ‘आमची मुले त्याची किंमत आहेत’.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Delightful Thailand Tour | आयआरसीटीसी स्वस्त थायलंड टूर पॅकेज, फक्त इतका खर्च करावा लागेल, जाणून घ्या डिटेल्स
जर तुम्ही ऑक्टोबर महिन्यात थायलंडला भेट देण्याचा विचार करत असाल तर आयआरसीटीसीने तुमच्यासाठी एक उत्तम एअर टूर पॅकेज आणलं आहे. या पॅकेज अंतर्गत तुम्हाला 5 रात्री आणि 6 दिवस थायलंडला जाण्याची संधी मिळणार आहे. या पॅकेजअंतर्गत तुम्हाला थायलंडच्या सुंदर ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Johnson & Johnson Baby Powder | अमेरिका-कॅनडा मध्ये अनेकांना कॅन्सर, जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरची विक्री भारतात बंद होणार
जॉन्सन अँड जॉन्सनने 2023 पासून टॅल्क बेबी पावडर न विकण्याचा निर्णय घेतला आहे. या पावडरमुळे कॅन्सरच्या तक्रारींवर कंपनीवर हजारो खटले दाखल होत असून दोन वर्षांपूर्वी अमेरिका आणि कॅनडामध्ये त्याची विक्री बंद झाली. आता कंपनीने उर्वरित जगात त्याची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉर्नीने म्हटले आहे की, आता टॅल्कऐवजी कॉर्नस्टार्चचा वापर केला जाईल. कंपनीला या टाल्कसंदर्भात खटल्यांचा सामना करावा लागला आहे, असे स्पष्ट करा.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती