5 February 2025 5:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: APOLLO HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल
x

VIDEO | चीनच्या अनेक बँका कंगाल झाल्या, लोकांची एटीएम बाहेर पैसे काढण्यासाठी गर्दी, सरकारने रणगाडे तैनात केले

China Banks bankruptcy

VIDEO China Banks | चीनबाबत ज्या प्रकारची चर्चा होते, नेमकी तीच चर्चा होऊ लागली आहे. चीनच्या हेनान प्रांतात गेल्या अनेक आठवड्यांपासून पोलिस आणि लोकांमध्ये चकमक सुरू आहे. यामागील कारण म्हणजे लोकांना बँकांमधून त्यांच्या ठेवी काढण्याची परवानगी नाही.

लोकांचे उग्र रूप पाहून रणगाडे चीनच्या रस्त्यांवर :
लोकांचे उग्र रूप पाहून पोलीस आणि चिलखती रणगाडे चीनच्या रस्त्यांवर उतरले आहेत. चीनमधील प्रसारमाध्यमे सरकारी नियंत्रणाखाली असल्याने अशा बातम्या मुख्य माध्यमांतून बाहेर येऊ शकत नाहीत. म्हणूनच लोक वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या चकमकींचे व्हिडिओ शेअर करत आहेत आणि त्यांच्या पैशांची मागणी करत आहेत.

हे आहे प्रकरण :
हे प्रकरण बँक ऑफ चायनाच्या हेनान शाखेशी संबंधित आहे. ठेवीदारांनी त्यांच्या शाखेत ठेवलेला पैसा ‘इन्व्हेस्टमेंट’मध्ये असून, तो आता काढता येणार नाही, असे मेनान शाखेने नुकतेच जाहीर केले होते. यानंतर लोकांच्या संतापाचा भडका उडाला. एका आंदोलनानंतर हेनानची राजधानी झेंगझोऊमध्येही हिंसाचार झाला.

त्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले होते की ते अशा ठेवीदारांना टप्प्या टप्प्याने पैसे देण्यास सुरवात करतील ज्यांचा पैसा अनेक ग्रामीण बँकांनी गोठविला आहे. पहिली रक्कम १५ जुलै रोजी दिली जाणार होती. पण काही ठेवीदारांनाच पैसे मिळाले. अशा स्थितीत बँकांकडे पैसे शिल्लक आहेत की नाही, अशी भीती पसरली आहे. त्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या आहेत. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, बँकांच्या संरक्षणासाठी आणि स्थानिकांना बँकांपर्यंत पोहोचू नये यासाठी या लष्कराचे रणगाडे रस्त्यावर उतरवण्यात आले आहेत. लष्कराचे रणगाडे बँका आणि बँकांच्या एटीएमसमोर तैनात करण्यात आल्या आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: VIDEO China Banks bankruptcy government deploy army Tank outside banks check details 21 July 2022.

हॅशटॅग्स

#China Banks bankruptcy(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x