एकट्या चीनमुळे १८४ देशांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत - डोनाल्ड ट्रम्प
वॉशिंग्टन, २९ एप्रिल: जगभरात कोरोनानं थैमान घातलं असून याचा सर्वात मोठा उटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे जवळपास ६० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू न्यूयॉर्कमध्ये झाले आहेत. तसेच करोना विषाणूमुळे अमेरिकेतील बळींचा आकडा ७० हजारांपर्यंत जाऊ शकतो, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र, मूळातील बळींचा संभाव्य आकडा हा अधिक असून तो कमी झाल्यामुळे मतदारांनी आता मला त्यामुळे नोव्हेंबरमध्ये पुन्हा मत देण्यास काही हरकत नाही, असे ते म्हणाले.
व्हिएतनाम युद्धामध्ये जितक्या अमेरिकी नागरिकांचा मृत्यू झाला, त्यापेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू सहा आठवड्यात झाल्यामुळे अध्यक्षांना नागरिकांनी पुन्हा निवडून का द्यावे, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला होता. त्याला उत्तर देताना त्यांनी वरील वक्तव्य केले. व्हिएतनाम युद्धात ५८ हजार अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला होता. जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील आकडेवारीनुसार अमेरिकेमध्ये करोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ५५ हजारांपुढे गेली आहे. साथीच्या आजारामुळे २२ लाखांचा मृत्यू होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्या तुलनेत ६० ते ७० हजार आकडा हा कमी असल्याचे ट्रम्प म्हणाले.
दुसरीकडे कोरोना विषाणूचे संक्रमण सुरुवातीच्या टप्प्यातच रोखण्यात चीन अपयशी ठरल्यामुळे आज १८४ देशातील नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागताहेत, अशी टीका देखील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. कोरोना विषाणू संक्रमणामुळे अमेरिकेत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेने चीनमधील आपली विविध वस्तू उत्पादनाची कामे थांबवावीत, अशी मागणी अमेरिकेतील काँग्रेस सदस्यांकडून केली जाते आहे.
कोरोना विषाणूच्या जागतिक संक्रमणाला चीनच जबाबदार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प सातत्याने सांगताहेत. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या जागतिक महामारीला चीनच जबाबदार असल्याचे सांगत नुकसानभरपाई म्हणून चीनने १४० अब्ज डॉलर द्यावेत, असे जर्मनीने म्हटले आहे. पण चीनकडून आणखी मोठी नुकसानभरपाईची मागणी करण्याच्या विचारात असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
News English Summary: Corona has been used all over the world, with the United States being the biggest loser. Corona has killed nearly 60,000 people in the United States. Most of these deaths occurred in New York. Also, the death toll from the corona virus in the United States could rise to 70,000, according to US President Donald Trump. “However, the potential number of casualties is higher and as it has come down, voters now have no problem voting for me again in November,” he said.
News English Title: 184 nations going through hell as Covid 19 was not stopped at source US President Donald Trump News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON