Global Warming | पुढील 20 वर्षात जागतिक तापमान 1.5 अंशांनी वाढेल | महाविनाशाला सुरुवात होईल - शास्त्रज्ञांचा दावा
मुंबई, १४ ऑगस्ट | या वर्षी 9 जुलै रोजी कॅनडात पहिल्यांदा पारा 49.6 अंशांवर पोहोचला. भीषण उकाड्यामुळे लोक हैराण झाले होते. तर दुसरीकडेच त्याच दिवशी अमेरिकेच्या उत्तर कॅलिफोर्निया सीमेवर 4 लाख एकरपेक्षा जास्त जंगलाच वणवा पेटला होता. न्यूझीलंडमध्ये इतका बर्फ पडला की रस्ते बंद झाले. घरातून बाहेर पडण्यास बंदी घातली गेली.
हवामानाच्या या विलक्षण बदलावर 60 देशांतील 200 शास्त्रज्ञांनी संशोधन केले आणि 3,500 पानांचा अहवाल लिहिला. सात वर्षांच्या अभ्यासानंतर, जेव्हा या अहवालाला नाव देण्याची वेळ आली, तेव्हा शास्त्रज्ञांनी त्याला a code red for humanity म्हणजे मानवी जीवन धोक्याच्या लाल पातळीवर पोहोचले आहे असे म्हटले आहे.
ग्लोबल वॉर्मिंग,पुढील 20 वर्षात जागतिक तापमान 1.5 अंशांनी वाढेल, महाविनाशाला सुरुवात होईल, शास्त्रज्ञांचा दावा – 200 scientists said in next 20 years the global temperature will increase by 15 degrees devastation will start :
हवामानाच्या तीव्र परिस्थितीमुळे हाहाकार माजेल:
या संशोधनातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हवामानाची अत्यंत वाईट परिस्थिती. अभ्यासानुसार, भूस्खलन, मुसळधार पाऊस, ढगफुटी, चक्रीवादळ, गारपीट, पूर किंवा तीव्र दुष्काळ यासारख्या आपत्ती जी 50 वर्षांतून एकदा येते असते, 2100 सालापर्यंत दरवर्षी येईल.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात कॅनडाचे तापमान जे सरासरी 16.4 अंश सेल्सिअस असते, ते 49.6 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. याचे कारण उष्णतेची लाट होती. शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे, कार्यालये, लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली होती. कॅनडातील व्हँकुव्हर, पोर्टलँड, इडाहो, ओरेगॉनच्या रस्त्यांवर वॉटर स्प्रिंकलर मशीन बसवण्यात आली. आगीच्या भीतीने वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या 2 दिवसात न्यूझीलंडमध्ये 8 इंचापेक्षा जास्त बर्फ पडला. 55 वर्षांनंतर जून -जुलैमध्ये न्यूझीलंडचे तापमान -4 अंशांपर्यंत पोहोचले होते. इतकी थंडी पडत होती की राजधानी वेलिंग्टनमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली. समुद्राच्या किनाऱ्यावर 12 मीटर उंच लाटा उसळत होत्या.
पृथ्वीच्या एका भागात मुसळधार [पाऊस असेल, तर एक मोठा भाग दुष्काळामुळे ग्रस्त असेल, उष्णतेने तापेल:
संशोधनात असेही दिसून आले आहे की, उच्च अक्षांशांच्या फक्त एका लहान भागात पाऊस पडेल. उच्च अक्षांश क्षेत्र म्हणजे वर्षभर पाऊस पडत असतो. यामध्ये युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियाचा काही भाग आणि न्यूझीलंडचा बहुतेक भाग समाविष्ट आहे. येथे पावसाचा जोर आणखी वाढेल. इतका की पूरसदृश परिस्थिती कायम राहील. उर्वरित मोठा भाग सतत तापत राहिल. याच वर्षी हंगेरी, सर्बिया, युक्रेन या युरोपियन देशांमध्ये विक्रमी उष्णतेची लाट पसरली होती. पारा 40 अंशाच्या वर पोहोचला होता, इटलीमध्ये इतका पाऊस पडला की प्रचंड पूर आला. जर्मनीमध्ये चक्रीवादळाने कहर केला. 120 वर्षांनंतर, रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये तापमान 35 अंशांवर पोहोचले.
वर्षभरापूर्वी जगाच्या हवामानाचा मागोवा ठेवणाऱ्या जागतिक हवामान संघटनेने म्हणजेच WMO ने सांगितले होते की, अंटार्क्टिकाच्या पर्वतांमध्ये तापमान वाढत आहे. 2020 मध्ये प्रथमच येथील तापमान 20 अंशांवर पोहोचले होते. जर हिमनद्या इथे वितळू लागल्या तर समुद्रात वाढलेले पाणी पृथ्वीवर कहर निर्माण करेल.
आपल्याकडे 15 वर्षांत हवामान बदलाचे अत्यंत वाईट परिणाम दाखवणा-या 310 घटना घडल्या आहेत 1970 ते 2005 दरम्यानच्या 35 वर्षांमध्ये, हवामान बदलाच्या अत्यंत वाईट परिस्थितीमुळे 250 घटना घडल्या होत्या, परंतु 2005 ते 2020 दरम्यान, फक्त 15 वर्षात 310 अशा घटना घडल्या. या वर्षी 7 फेब्रुवारी रोजी उत्तराखंडमध्ये हिमनदी फुटल्याने ऋषीगंगा आणि धौलीगंगा खोऱ्यांमध्ये अचानक पूर आला. सुमारे 200 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
15 वर्षांत दुष्काळ 13 पटीने वाढला, 40% पूरप्रवण जिल्ह्यांमध्ये दुष्काळ:
2005 ते 2020 पर्यंत दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये 13 पट वाढ झाली आहे. 2005 पर्यंत भारतात फक्त 6 दुष्काळग्रस्त जिल्हे होते, पण आता त्यांची संख्या वाढून 79 झाली आहे. यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता केवळ 40% पूरप्रवण जिल्ह्यांनाही दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. 2005 पासून चक्रीवादळामुळे प्रभावित जिल्ह्यांची संख्या वार्षिक सरासरी दुप्पट झाली आहे. गेल्या दशकात, पूर्व किनारपट्टीचे सुमारे 258 जिल्हे चक्रीवादळामुळे प्रभावित झाले आहेत.
3 दिवसांचा पाऊस 3 तासात पडू लागला:
स्कायमेटचे महेश पहलवत म्हणतात की, पूर्वी अरबी समुद्राची वादळे 2 वर्षात एकदा यायची, आता ती वर्षातून दोनदा येऊ लागली आहेत. ते भारताच्या हवामानाचा ओलावा सौदी अरेबियाकडे ओढतात. यामुळे भारतातील पावसावर पुढील पाच वर्षे वाईट परिणाम होतो.
10 वर्षांपूर्वी 3 दिवसांत जेवढा पाऊस पडायचा तेवढा पाऊस आता 3 तासात होतो. यापूर्वी, 1 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान 122 दिवसांत सुमारे 880 मिमी पाऊस पडायचा. तरीही, पावसाचे एकूण प्रमाण फारसे बदललेले नाही, परंतु पावसाचे दिवस आता 60 किंवा त्यापेक्षा कमी झाले आहेत. पावसाळी दिवस म्हणजे ज्या दिवशी 2.4 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला तो दिवस पावसाचा दिवस असतो.
IPCC म्हणजे काय?
इंटरगव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) ही संयुक्त राष्ट्रांची एक संस्था आहे. 1988 साली हवामान बदलासंबंधी अभ्यास करण्यासाठी तिची स्थापना झाली. ही संस्था वेगवेगळ्या सरकारांना जागितक तापमानवाढीसंदर्भात स्वतःचं धोरण ठरवण्यासाठी शास्त्रीय माहिती पुरवते. 1992 साली या संस्थेने हवामान बदलावरचा पहिला सर्वसमावेशक मूल्यांकन अहवाला सादर केला होता. 9 ऑगस्ट रोजी या संस्थेने सहावा अहवाल सादर केला.
IPCC’चा गंभीर इशारा:
जागतिक हवामान बदलाबाबत आयपीसीसीनं आशिया खंडातील देशांना गंभीर इशारे दिले आहेत. तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढण्याचा इशारा अहवालातून देण्यात आला आहे. आशियातील समुद्राची पातळी जागतिक दरापेक्षा वेगाने वाढत आहे, असं अहवालात सूचित करण्यात आलं आहे.
परिणामी या शतकाच्या अखेरीस देशाच्या किनारपट्टीवरील मुंबईसह १२ शहरं पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. या शहरांमध्ये मुंबई, चेन्नई, कोची आणि विशाखापट्टणमचा समावेश आहे. शतकाच्या अखेरीस ही शहरं ३ फूट पाण्यात असतील असं सांगण्यात आलं आहे. २००६ ते २०१८ या कालावधीत जागतिक समुद्राची पातळी दरवर्षी सुमारे ३.७ मिलीमीटर दराने वाढत आहे.
अंतराळ संशोधन संस्था नासानं आयपीसीसीच्या अहवालाचं मूल्यांकन केलं आहे. यापूर्वी १०० वर्षात असे बदल होत होते. मात्र २०५० नंतर दर सहा ते नऊ वर्षांनी असे बदल दिसतील असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. “२१ व्या शतकात समुद्राच्या पातळीत सतत वाढ होताना दिसेल. त्यामुळे समुद्राजवळील सखल भागात पाणी येण्याच्या घटना वाढतील. यापूर्वी १०० वर्षात असे बदल होत होते”, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
शतकाच्या अखेरीस किनारपट्टीवरील ‘या’ शहरांना धोका:
* कांडला- १.८७ फूट
* ओखा- १.९६ फूट
* भावनगर- २.७० फूट
* मुंबई- १.९० फूट
* मोरमोगाओ- २.०६ फूट
* मँगलोर- १.८७ फूट
* कोचिन- २.३२ फूट
* पारादीप- १.९३ फूट
* खिडीरपूर- ०.४९ फूट
* विशाखापट्टणम- १.७७ फूट
* चेन्नई- १.८७ फूट
* तुतीकोरीन- १.९ फूट
आयपीसीसी १९८८ पासून दर पाच ते सात वर्षांनी पृथ्वीच्या हवामान बदलाचं मूल्यमापन करते. यात तापमान, बर्फाचे आवरण, वायू उत्सर्जन आणि समुद्राच्या पाणी पातळीवर लक्ष केंद्रीत केलं जातं. दुसरीकडे हिमालयातील बर्फ वितळण्यास सुरुवात झाली असून डोंगरावरील बर्फाचं आवरण कमी होत आहे. १९७० पासून हिमालयातून उगम पावलेल्या नद्यांही आकुंचन पावत असल्याचं, कृष्णा अच्युत राव यांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे.
संयुक्त राष्ट्राच्या समितीचा इशारा:
मानव समुदायाने आजघडीला कार्बन ऊत्सर्जन लक्षणीयरित्या कमी केले तरीही काही दुष्परिणाम हे टाळणे अशक्यच असल्याचा गंभीर इशारा संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदलावरील आंतरसरकारी समितीने सोमवारी प्रकाशित केलेल्या एका ताज्या अहवालातून दिला आहे. आपण अगोदरच इतके ऊत्सर्जन करून ठेवले आहे की, त्याचे काही गंभीर दुष्परिणाम आपल्याला भोगावेच लागणार असल्याचे या अहवालाच्या निष्कर्षात म्हटले आहे.
या तीन हजार पानी अहवालाच्या निष्कर्षानुसार दोन्ही ध्रुवांवरील हिमनग अतिशय वेगाने वितळत असून सागरी पाणीपातळीही त्याच वेगाने वाढत आहे. याच्या परिणामी ऋतुचक्रातही अतीतीव्र टोकाचे बदल बघायला मिळत आहे. विनाशकारी चक्रीवादळे, महापूर, अतिवृष्टी, ढगफुटी, अतीतीव्र उष्णता आणि अतीतीव्र थंडीच्या लाटा हे याचेच परिणाम आहेत. आज आपण ऊत्सर्जनात लक्षणीय घट केली तरी काही दुष्परिणाम हे टाळता येणे अशक्य असल्याचे या अहवालात म्हटले आहे. कारण आपण आधीच वातावरणात मोठ्या प्रमाणात हरीतगृह वायूंचे ऊत्सर्जन करून ठेवले आहे असे यात स्पष्टपणे म्हटले आहे.
मानवी कृतींमुळेच ग्लोबल:
वॉर्मिंगऔद्योगिकीकरणानंतरच्या ग्लोबल वॉर्मिंगसाठी प्रामुख्याने उष्णता शोषून घेणारे कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनसारखे वायू कारणीभूत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. मानवी कृतीद्वारे कोळसा, इंधन, तेल, लाकडू आणि नैसर्गिक वायूच्या ज्वलनातून हे निर्माण झाले आहे. यात नैसर्गिक वायूच्या ज्वलनाचा अगदीच थोडा वाटा असल्याचे यात म्हटले आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: 200 scientists said in next 20 years the global temperature will increase by 15 degrees devastation will start news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो