18 January 2025 9:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

अमेरिकेत कोरोनामुळे तब्बल ९०,३३८ नागरिकांचा मृत्यू

United States of America, corona virus, covid 19

वॉशिंग्टन, १९ मे : अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृतांची संख्या ९० हजारांच्या पुढे गेली आहे. येथे गेल्या २४ तासांत एकूण ७७९ लोकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ९०,३३८ पर्यंत पोहोचला आहे. जगातील कोणत्याही देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या ही सर्वात जास्त आहे.

अमेरिकेत आतापर्यंत १५ लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. अमेरिकेत आतापर्यंत दहा लाखाहून अधिक लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. एकीकडे कोरोना विषाणूचा अमेरिकेत कहर सुरु असताना दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प सतत देशातील व्यवहार उघडण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सोमवारीही त्यांनी अनेक ट्वीट केले ज्यात त्यांनी देशातील अऩेक गोष्टी उघडण्याविषयी सांगितले आणि विरोधकांवर आरोप केले की ते त्यांना यापासून रोखत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शाब्दिक चकमक सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे. यापूर्वीही डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर आरोपही केले होते. तसंच निधी रोखण्याचाही इशारा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी “संघटनेत सुधारणा करा अन्यथा ३० दिवसांत तुमचा निधी कायमचा बंद करू” असा जागतिक आरोग्य संघटनेला दिला आहे. ट्रम्प यांनी पत्राद्वारे हा इशारा दिला आहे.

“जगाला बरीच किंमत मोजावी लागणार्‍या कोरोना विषाणूच्या साथीचा सामना करण्यासाठी आपली संस्था आणि आपण वारंवार चुकीची पावले उचलली आहेत हे स्पष्ट झालं आहे. चीनपासून आपण स्वतंत्र आहोत हे सिद्ध करणं हा संघटनेला पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. या जागतिक संघटनेत सुधारणा करण्यासाठी माझ्या प्रशासनाने तुमच्याशी चर्चा सुरू केली आहे. परंतु त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे. वेळ वाया घालवून चालणार नाही,” असंही ट्रम्प म्हणाले.

 

News English Summary: The death toll from the corona virus in the United States has risen to more than 90,000. A total of 779 people have been killed in the last 24 hours, bringing the death toll to 90,338. The number of deaths due to corona is the highest in any country in the world.

News English Title: 90 thousand deaths in United States of America because of corona covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x