भारतीय सैन्याकडून चीनचा कमांडिंग ऑफिसर ठार झाल्याचं चीनकडून मान्य
लडाख, २२ जून: ६ जूनला झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी होतेय का, हे पाहण्यासाठी भारतीय जवानांची तुकडी १५ जूनला गलवान भागात गेली होती. बैठकीत ठरल्याप्रमाणे चिनी सैन्यानं या भागातील पोस्ट हटवावी, असं आवाहन जवानांकडून करण्यात आलं. मात्र चिनी सैन्यानं कर्नल संतोष बाबू यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर भारतीय जवान संतापले आणि त्यांनी चिनी सैन्याला झोडपून काढण्यास सुरुवात केली होती.
बिहार रेजिमेंट आणि पंजाब रेजिमेंटच्या जवानांनी चिनी सैन्यावर हल्ला चढवला. रात्री अंधार असल्यानं फारसा अंदाज येत नव्हता. मात्र या परिस्थितीतही शीख सैनिकांनी योग्य अंदाज घेत चिनी अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं. त्या अधिकाऱ्याला थेट उचलून आणण्यात आलं. एबीपी न्यूजनं याबद्दलचं वृत्त दिलं होतं. पंजाब रेजिमेंटचे जवान पराक्रम गाजवत असताना बिहार रेजिमेंटचे जवानही त्यांच्या बरोबरीनं लढत होते. बिहार रेजिमेंटच्या जवानांनी अनेक चिनी जवानांच्या माना मोडल्या. बाबू यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय जवान चिनी सैन्यावर अक्षरश: तुटून पडले होते.
दरम्यान, पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात १५ जूनच्या रात्री झालेल्या संघर्षात चीनचा कमांडिंग ऑफिसर ठार झाला. मागच्या आठवडयात भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठीकत चीनने स्वत: हे सांगितले होते. नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चिनी सैन्य अधिकाऱ्यांमध्ये चुशूलमधील मोल्डो येथे बैठक सुरु असताना ही माहिती समोर आली आहे. मोल्डो हे ठिकाण चीनमध्ये आहे. १९६७ नंतर प्रथमच मागच्या आठवडयात गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने चीनचा कमांडिंग ऑफिसर ठार झाल्याचे वृत्त दिले आहे.
News English Summary: A Chinese commanding officer was killed in a clash on the night of June 15 in the Galvan Valley in eastern Ladakh. China had said this during a meeting with Indian military officials last week. The information came as Indian and Chinese military officials were meeting in Moldo, Chushul, to ease tensions along the Line of Control.
News English Title: A Chinese commanding officer was killed in a clash on the night of June 15 in the Galvan Valley in eastern Ladakh News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Diwali 2024 | आपण दिवाळी सण साजरा करतो, परंतु दिवाळीच्या या 4 दिवसांचे महत्व माहित आहे का, जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Suzlon Share Price | सुझलॉन कंपनी बाबत मोठी अपडेट, शेअर होणार रॉकेट, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: Suzlon
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO