22 December 2024 7:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

आता पूर्व दौलत बेग ओल्डीमध्ये चीनकडून सैन्याची जुळवाजुळव करण्यास सुरूवात

Galwan China, Daulat Beg Oldi and Depsang, Ladakh

लडाख, २४ जून : पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीत निर्माण झालेला तणाव निवळण्याची चिन्ह असतानाच चीनच्या कुरापती पुन्हा सुरू झाल्याची समोर येत आहे. पूर्व लडाखमधील काही नव्या भागात चीनच्या बाजूने जमवाजमव सुरू झाली असून, त्यामुळे पीपल्स लिबरेशन आर्मीकडून भारतासाठी सामरिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या दौलत बेग ओल्डी आणि डेपसांग या भागात मोर्चा उघडण्यात येण्याची शक्यता बळावली आहे.

इंडिया टुडेनं खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्यानं याविषयीचं वृत्त दिलं आहे. पूर्व दौलत बेग ओल्डीमध्ये चीननं सैन्याची जुळवाजुळव करण्यास सुरूवात केली आहे. जून महिन्यात चिनी बेस जवळ कॅम्प व वाहन दिसून आली आहेत. चीनने हे बेस २०१६च्या आधी बनवले होते. परंतु या महिन्यात सॅटेलाईट छायाचित्र टिपण्यात आली. त्यात कॅम्प व वाहनांसाठी रस्ते बनवण्यात आले आहेत.

दरम्यान, चीन डेपसांग भागात जमवाजमव करू शकतो, याची कुणकुण भारताला मेच्या अखेरीसच लागली होती. तेव्हापासून या भागातील लष्कराची उपस्थिची भक्कम करण्यात आली होती. डेपसांग भागाताच चिनी सैन्याने २०१३ मध्ये घुसखोरी केली होती.

प्रसार माध्यमांना मिळालेल्या वृत्तानुसार, चीनचा हेतू आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. काराकोरम खिंडीजवळील भागात अतिक्रमण करून चीनला पाकिस्तान व युरोपकडे जाणाऱ्या महामार्गाचं काम करायचे आहे. हे महामार्ग भारतीय भूभागाच्या वरच्या बाजूला असलेल्या शेनझेन प्रातांतून जातात. दौलत बेग ओल्डी सेक्टरमध्ये चिनी सैन्य भारतीय लष्कराच्या गस्ती मार्गामध्ये अडथळे आणण्याच्या प्रयत्नात आहे. दौलत बेग ओल्डी सेक्टरमधील पेट्रोलिंग पॉईंट १० व १३ कडे जाणाऱ्या पथकांना चिनी सैन्य रोखत आहे. हे सर्व दौलत बेग सेक्टरमधील भारतीय बटालियन व गलवान नदी खोऱ्याला लागून आहे.पेट्रोलिंग पॉईंट १५, पेट्रोलिंग पॉईंट १७ व पेट्रोलिंग पॉईंट १७ अ जवळ वाहने व तोफा आणण्यासाठी चीन त्यांच्या रस्त्यांचा वापर करत आहे,” असं सूत्रांनी सांगितलं.

 

News English Summary: In the East Daulat Beg Oldi, China has begun to mobilize troops. Camps and vehicles were spotted near the Chinese base in June. The base was built by China before 2016. But satellite imagery was captured this month.

News English Title: After Galwan China is now preparing to infiltrate Daulat Beg Oldi and Depsang in Ladakh News latest Updates.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x