18 January 2025 9:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

ट्रम्प यांना मोठा धक्का | जॉर्जिया आणि मिशिगनमध्ये कोर्टाने याचिका फेटाळली

US presidential election 2020, Donald Trump, Joe Biden

वॉशिंग्टन, ६ नोव्हेंबर: अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर सर्वच जगाचं लक्ष निकालांकडे लागलं आहे. विशेष म्हणजे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पायउतार होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यांचे स्पर्धक जो बायडन विजयाच्या टप्यात येऊन उभे राहिले आहेत. परंतु ट्रम्प मतगणनेच्या विरोधात थेट कोर्टात गेल्याने अंतिम निकाल येण्यासाठी खूप विलंब होतं आहे.

दरम्यान विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने दाखल केलेल्या मिशिगन आणि जॉर्जियामधील केसेस कोर्टाने फेटाळल्या आहेत. ट्रम्प यांनी या दोन्ही राज्यांमधील पोस्टल बॅलेट मतगणना थांबवण्याची मागणी करत याचिका दाखल केली होती. परंतु सदर याचिका कोर्टाने फेटाळली आहे.

दुसरीकडे जो बायडन यांनी आपल्या समर्थकांकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. कायद्याच्या लढाईमध्ये मदतीसाठी बायडन यांनी जाहीर आवाहन केले आहे. अमेरिकेत कायद्याची लढाई लढणे म्हणजे अत्यंत खर्चिक काम आहे. यासाठी तब्बल ७५ करोड रुपयांचा खर्च येऊ शकतो. त्यामुळे ट्रम्प कोर्टात गेल्यानंतर बायडन यांच्या टीमने तात्काळ ‘बायडन फाईट फंड’ स्थापन केला आहे.

त्यानंतर जो बायडन यांच्यासाठी आर्थिक मदतीचे जाहीर आवाहन या माध्यमातून केले आहे. जॉर्जियामध्ये ट्रंप आणि बायडन यांच्यातील मुकाबला रोमांचक झाला आहे. या ठिकाणी दोन्ही उमेदवारांची वोटिंग टक्केवारी समान झाली आहे. दोघांनाही या ठिकाणी 49.4 टक्के मते मिळाली आहेत.

 

News English Summary: All eyes are on the results of the US presidential election. In particular, incumbent President Donald Trump is likely to step down and his rival Joe Biden is on the verge of victory. But Trump has gone straight to court against the vote count, delaying the final verdict.

News English Title: All eyes are on the results of the US presidential election 2020 Joe Biden News Updates.

हॅशटॅग्स

#America(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x