5 November 2024 4:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

अमेरिकेचा इराकवर पुन्हा एअरस्ट्राईक; ६ जणांचा मृत्यू; युद्ध भडकण्याची शक्यता

America Air Strike in Iraq, Bagdadi

बगदादः अमेरिकेने इराकच्या बगदादमध्ये शनिवारी पुन्हा एक हवाई हल्ला केला. उत्तरी बगदादमध्ये शनिवारी सकाळी करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेने शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात जनरल कासिम सुलेमानी याच्यासह ८ जणांचा मृत्यू झाला होता.

अमेरिकेने गुरुवारी रॉकेट हल्ला करून कुद्स फोर्सचा प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी याला ठार केलं होतं. सुलेमानी त्याच्या फौजेसह बगदाद एअरपोर्टकडे जात होता नेमका त्याच वेळी अमेरिकेनं हवाई हल्ला केला. यात सुलेमानी ठार झाला. त्याच्याशिवाय या हल्ल्यामध्ये पॉप्युलर मोबलायझेशन फोर्सचा डेप्युटी कमांडर अबू महदी अल मुहांदिस हासुद्धा ठार झाल्याचं सांगण्यात येत आहे.

या हवाई हल्ल्यात दोन गाड्यांवर निशाणा साधण्यात आला. या गाड्यांमध्ये इराण समर्थक मिलिशिया हश्‍द अल-शाबीचे काही लोक असल्याचं म्हटलं जात आहे. या गाडीत असलेल्या सहाही जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप त्यांची ओळख पटली नाही, असं इराक सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेनं हा हल्ला हशद-अल-साबीच्या कमांडरला लक्ष्य करून केला होता. इराकमधील सरकारी माध्यमांनीदेखील या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बगदादच्या अमेरिकन दुतावासावर इराणच्या पुरस्कृत संघटनेने हल्ला चढविला होता. याचा बदला म्हणून अमेरिकेने गेल्या चार दशकांपासून हवा असलेल्या सुलेमानीचा खात्मा केला आहे. यामुळे पश्चिम आशियातील वातावरण संतप्त झाले असून इंधनाच्या किंमतीही वाढल्या आहेत. सुलेमानीच्या मृत्यूच्या वृत्तानंतर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूडच्या किंमतींमध्ये १.३१ टक्क्यांची वाढ झाली आहे. एक बॅरलची किंमत ६७.१२ डॉलरवर पोहोचली आहे. तर अमेरिकन क्रूडच्या किंमतीतही १.२४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

 

Web Title:  America Air Strike targets hashed commander in Iraq again.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x