अमेरिकेत शाळा उघडल्या | ९७ हजार मुलांना कोरोनाची लागण | जुलैमध्ये २५ मुलांचा मृत्यू
वॉशिंग्टन, ९ ऑगस्ट : भारतात आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्याही २० लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख २७ हजार ७५ इतकी झाली आहे. सध्या देशभरात कोरोना मोठ्या विकोपाला पोहोचला असून आरोग्य यंत्रणा देखील हतबल असल्याचं सिद्ध झालं आहे. अशा मध्ये केंद्र सरकार विषाची परीक्षा घेतंय अशी चर्चा सुरु झाली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा आणि शैक्षणिक संस्था पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली आहे. १ सप्टेंबर ते १४ सप्टेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा केंद्राचा विचार आहे. ३१ ऑगस्ट रोजी लॉकडाउन संपल्यानंतर केंद्र सरकारकडून निर्बंध शिथील करत नव्या गाइडलाइन्स प्रसिद्द केल्या जातील. त्यावेळी ही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाइम्सने यासंबंधी वृत्त दिलं होतं.
दुसरीकडे कोरोनानं जगभरात हाहाकार माजवलेला असून, अनेक देशांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन केलं आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता शाळा, कॉलेज आणि मॉलसारख्या गोष्टी बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण आता जगभरातील वेगवेगळ्या देशांत शाळा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. त्याच वेळी अमेरिकेत जुलैच्या शेवटच्या 15 दिवसांत सुमारे 97,000 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडिएट्रिक्सने एका अहवालात ही आकडेवारी जाहीर केली.
अहवालात असे म्हटले आहे की, अमेरिकेत एकूण 50 लाख संक्रमित लोकांपैकी सुमारे 3 लाख 38 हजार मुले आहेत. ही आकडेवारी समोर आल्यानंतर अनेक तज्ज्ञांनी शाळा उघडण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केवळ जुलैमध्येच कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत सुमारे 25 मुलांचा मृत्यू झाला. त्याच वेळी काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मुलांपासून कोरोना पसरण्याचा धोका कमी आहे आणि सर्व सुरक्षा खबरदारी घेऊन शाळा उघडल्या पाहिजेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्कच्या शाळांमध्ये शिकणार्या मुलांच्या पालकांना हा पर्याय दिला जात आहे की, त्यांनी मुलांना शाळेत किंवा रिमोट लर्निंगकडे पाठवावे.
News English Summary: Preparations are underway to start schools in different countries around the world. At the same time, in the last 15 days of July in the United States, about 97,000 children were found to be infected with corona. The figures were released in a report by the American Academy of Pediatrics.
News English Title: America Corona Virus 97000 children tested positive schools prepared to return News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH