21 November 2024 4:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचे टॉप कमांडर कासेम सुलेमानी ठार

Iran Quds Force Chief Qassem Soleimani, USA Military Air Strike

वॉशिंग्टन डीसी: अमेरिकेने गुरुवारी रात्री इराकची राजधानी बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे टॉप कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी ठार झाले आहेत. कासिम सुलेमानी यांचा ताफा बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जात असताना अमेरिकेकडून हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून हाशेद-अल-शबिबी फोर्सचे उपप्रमुख अबू मेहदी अल मुहांदिसही ठार झाल्याची माहिती आहे. इराकच्या सरकारी वृत्तवाहिनीने, कासिम सुलेमानी ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

तर डोनाल्ड ट्रम्प य़ांनी फक्त अमेरिकेचा झेंडा ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये कोणताही संदेश लिहिण्यात आलेला नाही. या हल्ल्यामुळे पश्चिम आशियामध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. सुलेमानी हा इस्लामिक रिव्होल्यूशनरी सेनेच्या एका ताकदवान विंग ‘कदस फोर्स’चा प्रमुख होता. अल महांदिस एका सशस्त्र सैनिकांच्या गराड्यात सुलेमानीला घेण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते. सुलेमानीचे विमान सिरिय़ा किंवा लेबनॉनहून बगदादला पोहोचले होते. सुलेमानी जसे विमानातून उतरले तेव्हाच अमेरिकेने मिसाईल डागले. सुलेमानीचा मृतदेह त्याच्या अंगठीवरून ओळखण्यात आला आहे.

सुलेमानी हा पश्चिम आशियात ईराणी कार्यक्रम राबवण्यारा प्रमुख रणनीतिकार मानला जातो. सीरियात आपली मुळे घट्ट करणे, तसेच इस्रायलमध्ये रॉकेट हल्ला करणे हे आरोप सुलेमानी यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. दीर्घ काळापासून अमेरिका सुलेमानीच्या मागावर होती.

 

Web Title:  America kills Iran Quds Force Chief Qassem Soleimani in Airstrikes tension in western Asian countries may increase.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x