5 November 2024 12:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News
x

चीनी पोलिसांनी हाँगकाँगमध्ये संतप्त आंदोलकांवर मसाल्याचे फवारे मारले

China, Hong Kong, National Standing Committee, National Security Law

हाँगकाँग, १ जुलै : हाँगकाँगवासियांची स्वायत्तता हिरावून घेणाऱ्या चीन सरकारच्या नव्या सुरक्षा कायद्याविरोधातील मे महिन्यापासून जनतेने तीव्र आंदोलन सुरु केलं. मात्र आंदोलन सहन न करण्याचे ठरविलेल्या चीनधार्जिण्या हाँगकाँग प्रशासनाने मोठा फौजफाटा वापरत कारवाई केली होती आणि २५० आंदोलकांना अटक करण्यात आलं होतं. त्यावेळी पोलिसांनी पॅलेट गन आणि पेपर स्प्रेचा वापर केला होता.

शहराच्या मुख्य भागात आंदोलन सुरू केल्यानंतर आंदोलकांनी पोलिसांबरोबर धक्काबुक्की केली होती. अनेक ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना मारहाण केली होती. हाँगकाँगवर अधिक नियंत्रण मिळविण्यासाठी चीन सरकार दहशतवाद आणि फुटीरतावाद यांचे कारण देत नवा सुरक्षा कायदा आणू पहात आहे, असा आंदोलकांचा दावा आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार, चीन सरकारला हाँगकाँगच्या कायदा यंत्रणेत बदल करता येणार आहे आणि यालाच आंदोलकांचा विरोध आहे.

दरम्यान, हॉंगकॉंगची स्वायत्तता आणि स्वातंत्र्य व लोकशाही यांचा गळा घोटणारा “नॅशनल सेक्युरिटी लॉ” चीनच्या राष्ट्रीय स्थायी समितीने मंजुर करताच आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यावर सही करताच हॉंगकॉंगमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यातच आज हॉंगकॉंगचा 23वा स्वातंत्र्यदिन आहे. आज शेकडो लोक रस्त्यावर येणार याची कल्पना असल्यामुळे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लादण्यात आली आहे. तरीही ही संचार बंदी मोडून हॉंगकॉंगच्या मध्यभागात 50 ते 60 लोक चीन विरोधी घोषणा देत रस्त्यावर आले. या आंदोलकांना पांगविण्यासाठी चिनी पोलिसांनी मसाल्याच्या पाण्याचे फवारे आंदोलकांवर मारले. या आंदोलनात स्वतंत्र हॉंगकॉंगचा झेंडा फडकवणाऱ्या एका आंदोलकाला अटक करून त्याच्याविरोधात नव्या “नॅशनल सेक्युरिटी लॉ” अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

News English Summary: Anger erupted in Hong Kong after China’s National Standing Committee approved a “National Security Law” that strangled Hong Kong’s autonomy and independence and democracy, and Chinese President Xi Jinping signed it.

News English Title: Anger erupted in Hong Kong after China’s National Standing Committee approved a National Security Law News latest Updates.

हॅशटॅग्स

#China(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x