16 April 2025 7:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी भारत वापरू शकणार अमेरिकेचा डेटा | चीन विरोधात मदत होणार

India USA Sign, Defence Pact BECA, China Delays Border

नवी दिल्ली, २७ ऑक्टोबर: भारताने अमेरिकेसोबत ऐतिहासिक BECA करार केला आहे. भारताने या करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे चीनचा चांगलाच तिळपापड झाला आहे. BECA करारामुळे भारत-अमेरिका लष्करी संबंध अधिक बळकट होणार आहेत. त्यामुळे चिनची चिंता वाढली आहे. भारत आणि चीनमध्ये मागच्या आठवडयात आठव्या फेरीची कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठक होणार होती. पण चीनने जाणीवपूर्वक या बैठकीला विलंब केला आहे.

भारत-अमेरिका टू प्लस टू चर्चेसाठी सोमवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ व संरक्षण मंत्री मार्क टी एस्पर सोमवारी भारतात दाखल झाले. भारत-अमेरिकेमध्ये वेगाने विस्तारत असलेल्या संरक्षण संबंधांमुळे चीनची चिंता वाढत चालली आहे. पूर्व लडाख सीमेवर दादागिरी करणाऱ्या चीनला या संरक्षण सहकार्य करारामुळे भविष्यात निश्चित फटका बसेल. टाइम्स नाऊने हे वृत्त दिले आहे.

चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा करार लक्षवेधी ठरला असून त्यामुळे भारताची संरक्षण क्षमता वाढणार असून नवीन तंत्रज्ञानही भारताला मिळणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ आणि संरक्षणमंत्री मार्क एस्पर हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी त्यांनी थेट चर्चा केली.

या चर्चेनंतर सर्वांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली होती. BECA करारामुळे अमेरिका भारताला मदत करणार असून क्षेपणास्त्र हल्ल्यांसाठी भारताला अमेरिकेचा डेटा वापरता येणार आहे. आपलं टार्गेट निश्चित करण्यासाठी हा डेटा महत्त्वाचा ठरणार आहे. अमेरिकेकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने कुठल्याही ठिकाणांचं अचुक लोकेशन ठरवता येणार आहे. त्यामुळे क्षेपणास्त्राला आपलं लक्ष्य गाठणं सोपं होणार आहे. आक्रमक चीला रोखण्यासाठी भारत आणि अमेरिकेने हा मोठा निर्णय घेतला आहे.

भारत आणि अमेरिका हे महान लोकशाही देश असून दोन्ही देशांनी एकत्र येत पुढे जण्याची ही सुवर्णसंधी आहे. जागतिक शांतता आणि सत्ता संतुलन योग्य राखण्यासाठी भारत आणि अमेरिका मोठी कामगिरी बजावू शकतात असं मत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी व्यक्त केलंय. चीनच्या विस्तारवादाला रोखण्याची आज गरज आहे असंही पॉम्पिओ म्हणाले.

 

News English Summary: As India and the United States have signed landmark defence pact BECA with an aim to bolster their military ties, the move has apparently become a matter of concern for China which is locked in a bitter standoff with New Delhi in eastern Ladakh. India and China were expected to hold the eighth round of Corps Commander-level talks last week but Beijing reportedly delayed the meeting. This comes as US Secretary of Defence Mark T Esper and Secretary of State Mike Pompeo arrived in India on Monday on a two-day visit for the Indo-US 2+2 dialogue during which they are expected to discuss several key and strategic issues, including the ongoing border tension between India and China in eastern Ladakh and Beijing’s growing assertiveness in the Indo-Pacific region.

News English Title: As India Us Sign Defence Pact BECA China Delays Border Talks News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या