युद्ध झाल्यास चिनी लष्कर काही मिनिटांमध्ये उद्ध्वस्त करेल अटल बोगदा | चीनचा दावा
बीजिंग, 06 ऑक्टोबर : अटल बोगद्याचे ३ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले. १९७२ मध्ये माजी आमदार लता ठाकूर यांनी सहा महिने बर्फात अडकून पडण्याच्या समस्येबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या ठिकाणी बोगदा निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यानंतर सन २००० मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी आपले मित्र टशी दावा ऊर्फ अर्जुन गोपाल यांच्या निमंत्रणावरुन केलांग येथे जाऊन रोहतांग बोगद्याच्या उभारणीची अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर २८ जून २०१० मध्ये सोनिया गांधी यांच्या हस्ते या बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. त्यावेळी बोगद्यासाठी १,३५५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती.
हिमाचल प्रदेशमध्ये मनाली-लेह मार्गावर उभारण्यात आलेला ९.०२ किमी लांबीच्या ‘अटल टनल रोहतांग’ या बोगद्याचे आज (शनिवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या बोगद्याचे वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या युद्धनीती विषयक धोरणाचा हा महत्वाचा भाग ठरणार आहे. हा जगातील सर्वात मोठा बोगदा असून भारतीय लष्कराला त्यामुळे पाकिस्तान आणि चीन सीमेपर्यंत सहज प्रवेश करता येणार आहे.
दरम्यान, चिनी सरकारचे वृत्तपत्र असणाऱ्या ग्लोबल टाइम्समधील एका लेखामधून आता हिमाचल प्रदेशमधील मनाली ते लाहौल-स्पिती या भागांना जोडणारा अटल बोगदा भारताला युद्धाच्या वेळी उपयोगी ठरणार नाही असं वक्तव्य करण्यात आलं आहे. सोमवारीच चीनमधील सर्वात महत्वाच्या वृत्तपत्रांपैकी एक असणाऱ्या ग्लोबल टाइम्समध्ये भारताच्या या महत्वकांशी प्रकल्पाबद्दल टीप्पणी करण्यात आली आहे.
लष्करी क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ असणाऱ्या साँग झाँगपिंग यांनी लिहिलेल्या लेखामध्ये दोन्ही देशांमध्ये शांतता असताना भारताला या बोगद्याचा भरपूर फायदा होईल असं म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी युद्धाच्या काळामध्ये या बोगद्याचा भारताला फारसा उपयोग होणार नाही कारण चिनी सैन्य काही मिनिटांमध्ये हा बोगदा उद्ध्वस्त करु शकतं, अशी दर्पोक्तीही या लेखात करण्यात आली आहे. युद्धाच्या वेळी खास करुन लष्करी लढाईमध्ये या बोगद्याचा विशेष काही फायदा नाहीय असंही लेखात म्हटलं आहे.
News English Summary: The tunnel will be of great help to Indian troops and their provision of supplies in peacetime; however, it has no benefit in wartime, especially if military conflict breaks out. The Chinese People’s Liberation Army has means to make this tunnel unserviceable. It is better for China and India to coexist peacefully with each other. India should restrain itself and refrain from provocation as no passage exist that can enhance India’s combat capability. After all, there is a certain gap in combat effectiveness between China and India, especially in terms of India’s systematic combat capability. India is far from reaching China’s level.
News English Title: Atal Tunnel To Have Limited Benefit To India In Wartime Says Global Times Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय