5 February 2025 3:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या
x

चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्यास त्याचा परिणाम भारतीयांच्याच जीवनावर होईल - ग्लोबल टाइम्स वृत्त

India China, boycott Chinese goods

बीजिंग, २० जून : भारत आणि चीनदरम्यानचे संबंध ताणले गेले आहेत. लडाखमध्ये झालेल्या हिंसेत २० भारतीय जवान शहीद झाल्यामुळे आणि चीनच्या हेकेखोरीला उत्तर देण्यासाठी आता केंद्र सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. चीनला आर्थिक दणका देण्याच्या उद्देशाने सरकारने योजना तयार केली आहे.

अशाचवेळी चीनकडून येणाऱ्या सर्व वस्तूंवर बंदी घालण्याची मागणीही समोर येत आहे. अनेकांनी काही मोहीम सुरू केली आहे. तर काही दुकानदारांनी आम्ही चीनचा माल विकत नाही असं आपल्या दुकानांवर लिहून ठेवल्याचं आपण पाहिलं आहे. सध्या आपल्या अत्यंत तीव्र भावना आहेत. चीनविरोधात आपल्या मनात रागही आहे. परंतु या गोष्टीकडे आपण भावनात्मक दृष्टीनं बघून चालणार नाही,” असं मत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक व्यक्त करत आहेत आणि नेमका त्याचाच धागा पकडून चीनने भारताला पुन्हा डिवचलं आहे.

भारताने चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केल्यानंतर चीनचा जळफळाट झाला आहे. भारताच्या या भूमिकेनंतर चीनमधील ग्लोबल टाइम्स या मुखपत्रातून चीनने भारताला आव्हान दिले आहे. चीनची जीडीपी भारताच्या तुलनेत पाच पट अधिक आहे. त्यामुळे छोटी असलेली भारताची अर्थव्यवस्था चीनला काय आव्हान देणार असं चीनने म्हटले आहे.

चिनी मालावर बहिष्कार घालणं हे भारताच्या हिताचं नाही. कारण अनेक चिनी वस्तुंचे उत्पादन भारत करू शकत नाही आणि युरोप, अमेरिकेकडून या वस्तु तेवढ्या कमी किंमतीत भारताला मिळणारही नाही. त्यामुळे भारताने अमेरिकेच्या धोरणांप्रमाणे अनुसरण करू नये. भारतीय नागरिकांच्या जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होईल, अशी धमकी देखील चीनकडून देण्यात आली आहे.

 

News English Summary: It is not in India’s interest to boycott Chinese goods. Because India cannot produce many Chinese goods and India will not get these goods from Europe and America at such a low price. China has also threatened to adversely affect the lives of Indian citizens.

News English Title: China has also threatened to adversely affect the lives of Indian citizens if boycott Chinese goods News Latest Updates.

हॅशटॅग्स

#China(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x