चीनमध्ये भारतीय वृत्तवाहिन्या, माध्यमसमूहांशी संबंधित वेबसाइट बॅन, व्हीपीएन सुद्धा नियंत्रित
बीजिंग, ३० जून : भारत चीन मधील संघर्षामुळे अनेक चिनी app रडारवर होते. चिनी app वरून भारतीयांची माहिती चोरली जात असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्थेनेही या app वर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी अॅप्ससंदर्भात इशारा दिला होता. भारत सरकारने या अॅप्सवर बंदी घालावी किंवा देशातील नागरिकांना ही ५२ चिनी अॅप्स वापरुन नये असा इशारा यंत्रणांनी दिला होता. ही ५२ अॅप्स सुरक्षित नसून, या अॅप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे असंही यंत्रणांनी म्हटलं होतं. सुरक्षा यंत्रणांनी सरकारला पाठवलेल्या यादीमध्ये टिक-टॉकबरोबरच युसी ब्राऊझर, एक्झेण्डर, शेअरइट, क्लीन मास्टर यासारख्या अॅप्सचा समावेश होता. भारत सरकारच्या या निर्णयानंतर १२ तासांच्या आतमध्ये भारतामध्ये गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरुन हटवण्यात आलं आहे. यासंदर्भातील माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. मात्र या संदर्भात अॅपल आणि गुगलने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तरी या दोन्ही महत्वाच्या प्लॅटफॉर्मवरुन हे अॅप हटवण्यात आलं आहे.
दरम्यान, मोदी सरकारनं चिनी अॅप्सवर बंदी घालल्यानंतर चीननेसुद्धा भारतीय वृत्तवाहिन्या आणि माध्यमसमूहांशी संबंधित सर्व वेबसाइट बॅन केल्या आहेत. चीनमध्ये भारतीय संकेतस्थळ किंवा थेट भारतीय टीव्ही पाहण्याची सुविधा आता फक्त आभासी खासगी नेटवर्क (व्हीपीएन) द्वारे मिळू शकते, पण गेल्या दोन दिवसांपासून व्हीपीएनची सुविधाही चीनमध्ये खंडित करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीजिंगच्या आदेशावरून भारतीय वृत्त वेबसाइटवर बंदी घालण्यात आली आहे.
बीजिंगमधील मुत्सद्दी सूत्रानुसार आता भारतीय टीव्ही चॅनेल्स केवळ आयपी टीव्हीच्या माध्यमातून पाहता येतील. एक्सप्रेस व्हीपीएन हे गेल्या दोन दिवसांपासून चीनमधील आयफोन आणि डेस्कटॉपवरही काम करत नाही. व्हीपीएनद्वारे सेन्सॉर केलेल्या वेबसाइट उघडणं शक्य नाही. चीननं भारतीय वेबसाइट रोखण्यासाठी एक प्रगत फायरवॉलही बनविला आहे, जो व्हीपीएनलाही रोखण्यास सक्षम आहे. या माध्यमातून चीन केवळ भारतीय वेबसाइट्सच ब्लॉक करत नाही, तर बीबीसी आणि सीएनएनच्या बातम्यांचे फिल्टरही करीत आहे. हाँगकाँगच्या कामगिरीशी संबंधित कोणतीही कथा या साइटवर येताच स्वयंचलितपणे ब्लॅकआऊट होते आणि बातमी हटवल्यानंतर ती वेबसाइट पुन्हा दिसू लागते.
News English Summary: After the Modi government banned Chinese apps, China has also banned all websites related to Indian news channels and media groups. The facility to watch Indian websites or live Indian TV in China can now be accessed only through the Virtual Private Network (VPN), but for the past two days, the VPN facility has also been discontinued in China.
News English Title: China has ban Indian news channels media groups websites and VPN are also controlled News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो