17 April 2025 10:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA
x

चीनकडून नेपाळमध्ये भारतविरोधी वातावरण निर्मिती, रेडिओवर भारतविरोधी गाणी

China, India, Nepal, Ladakh

काठमांडू, २१ जून : भारत आणि नेपाळ यांच्यातील वादग्रस्त नकाशानंतर त्याचा परिणाम आता शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या दोन देशांमधील संबंधांवर होऊ लागला आहे. भारतावर हल्ला केल्यानंतर चीनने चीनच्या आणि नेपाळच्या कम्युनिस्ट नेत्यांची एक बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली होती. विशेष म्हणजे भारताशी वैर पत्करून चीनशी मैत्री करण्यावर नेपाळने भर दिल्याचे पाहायला मिळत आहे.

एका बाजूला भारत सरकारकडे दुर्लक्ष करणारं नेपाळ सरकारने सध्या चीनच्या सरकारसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्याची सपाट लावल्याचं देखील वृत्त आहे. ज्या वेळी भारतासोबत नेपाळचे संबंध बिघडलेले असताना आणि चीन – भारत यांच्यात युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना, चीनसोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्सची चर्चा देखील नेपाळच्या वृत्तपत्रांमध्ये रंगली आहे.

भारत-चीन सीमेवर प्रचंड मोठा तणाव असताना नेपाळच्या वरिष्ठ सभागृहात दोन दिवसांपूर्वी नव्या नकाशाला मंजुरी देण्यासंदर्भातील विधेयकावर मतदान पार पडलं. नेपाळने उत्तराखंडमधील कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख या भारतीय प्रदेशांवर दावा केला आहे. त्यासाठी नेपाळने आपल्या नकाशामध्ये सुद्धा दुरुस्ती केली आहे. नेपाळने प्रसिद्ध केलेल्या नव्या नकाशाच्या बाजूने नॅशनल असेंब्लीत ५७ मते पडली. तर विरोधात कुणीही मतदान केले नाही. त्यामुळे हे विधेयक नॅशनल असेंब्लीमध्ये एकमताने पारीत झाले.

त्याचबरोबर चीनने भारताला घेरण्यास सुरुवात केली असून नेपाळमध्येही भारतविरोधी वातावरण तयार केले आहे. यामुळे नेपाळच्या रेडिओवर भारताविरोधी गाणी गाण्यात येत आहेत. तर काही ठिकाणी नेपाळी जनता भारतविऱोधात निदर्शने करत रस्त्यावर उतरली आहे. चीनने भारताच्या शेजारील देशांबरोबर हातमिळवणी केल्याचं पाहायला मिळत आहे. हे देश कर्जबाजारी झाल्याने चीनने त्यांना सढळ हाताने कर्ज देत स्वत:च्या बाजूने केले आहे. यात नेपाळ, पाकिस्तानचाही समावेश आहे. या देशांना जवळ करून चीनने भारताला घेरण्याची योजना आखली आहे. चीनने नेपाळला भारताविरोधात भ़डकावण्यास सुरुवात केली आहे. भारत नेपाळवर ताबा मिळवेल अशी भीती नेपाळी जनतेत चीनने निर्माण केली आहे.

 

News English Summary: China has begun to surround India and has created an anti-India atmosphere in Nepal as well. As a result, anti-India songs are being sung on Nepal’s radio. In some places, the Nepali people have taken to the streets to protest against India. China has been seen shaking hands with India’s neighbors.

News English Title: China has begun to surround India and has created an anti-India atmosphere in Nepal News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nepal(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या