23 December 2024 4:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

चीनने भारताच्या सीमेवर तैनात केले 60 हजार सैनिक | अमेरिकेचा दावा

China Deployed, 60 Thousand Soldiers, US State Secretary Mike Pompeo

वॉशिंग्टन, १० ऑक्टोबर : भारत आणि चीनच्या सीमेवर अजुनही तणाव कायम आहे. दोन्ही देशांच्या राजकीय आणि लष्करी पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत मात्र तणाव कमी झालेला नाही. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ (Mike Pompeo) यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. चीनने भारतासोबतच्या उत्तर सीमेवर तब्बल 60 हजार सैनिक तैनात केल्याचा दावा त्यांनी एका मुलाखतीमध्ये केला आहे.

भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया सदस्य असलेल्या ‘क्वाड’ (Quad) देशांच्या बैठकीत सर्वच देशांचे परराष्ट्रमंत्री प्रत्यक्ष भेटले होते. त्या बैठकीवर चीनने टीका केली होती. त्या टीकेचा समाचार घेताना पॉम्पिओ यांनी चीनवर सडकून टीका केली. चीनचा व्यवहार हा बेजबाबदार आणि धोकादायक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

“भारत, ऑस्ट्रेलिया, जपान यांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत मी होतो…चार सर्वात मोठ्या लोकशाही, चार शक्तिशाली अर्थव्यवस्था, चार देश…प्रत्येक देशाला चिनी कम्युनिस्ट पार्टीकडून धोका आहे. याचा जाणीव त्यांना आपल्या देशातही होत आहे,” असं माइक पोम्पिओ यांनी The Guy Benson कार्यक्रमात सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “प्रत्येकाला याची जाणीव आहे. मग ते भारतीय असोत ज्यांना हिमालयात सैन्यासोबत लढा द्यावा लागत आहे. चीनने लडाखमध्ये आता मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली आहे”. चीनला रोखण्यासाठी क्वाड देश धोरण आखत असल्याची माहिती माइक पोम्पिओ यांनी दिली आहे. तसंच भारताला चीनविरोधात लढा देताना नक्कीच अमेरिकेची साथ मिळणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

 

News English Summary: China has amassed more than 60,000 troops on India’s northern border, U.S. Secretary of State Mike Pompeo has said as he hit out at Beijing for its “bad behavior” and the threats it poses to the Quad countries. The Foreign Ministers from the Indo-Pacific nations known as the Quad group the US, Japan, India and Australia met in Tokyo on Tuesday in what was their first in-person talks since the coronavirus pandemic began.

News English Title: China Has Deployed 60 Thousand Soldiers At Lac With India Says Us State Of Secretary Mike Pompeo Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x