चीन दगाबाजीच्या तयारीत? लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या सीमेवर चीनची लढाऊ विमानं सज्ज
पेइचिंग, २२ जून : गेल्या आठवड्यात गलवान भागात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झटापट झाल्यानंतर सीमावर्ती भागातील हालचाली वाढल्या आहेत. मोदी सरकारनं लष्कराला फ्री हँड दिला आहे. त्यामुळे लष्कराला अधिकचे अधिकार मिळाले आहेत. लेहमध्ये मिग-२९ विमानं आणि अपाचे हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत. यानंतर चिनी सैन्याकडूनही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. लडाखपासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंतच्या सीमेवर चीननं लढाऊ विमानं सज्ज ठेवली आहेत.
भारत-चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव वाढल्यानंतर दोन्ही देशांनी आपले सैन्य अधिक सज्ज ठेवण्यावर भर दिला आहे. भारतीय हवाई दलाने मिग-२९ आणि अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर सज्ज ठेवले आहेत. मात्र भारतीय सैनिकांची गस्त थांबवण्यासाठी पेंगाँग सो सरोवराजवल चीनने आक्रमकपणे देखरेख वाढवली आहे.
‘दि ट्रिब्युन’ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने भारताच्या सीमेलगत असलेल्या होटाना, नग्यारी, शिगात्से आणि नयिंगची या ठिकाणच्या हवाई तळावर अतिरिक्त लढाऊ विमाने, बॉम्बर आणि लढाऊ हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. त्याशिवाय चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. पेगाँग सो सरोवराजवळ चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न करत आहे. त्याशिवाय चीनने गोगरा हॉट स्प्रिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले आहेत. चीनच्या या हालचालींमुळे भारताच्या देपसांग, मुर्गो, गलवान, हॉट स्प्रिंग, कोयूल, फुकचे आणि देमचोक या भागांमध्ये धोका वाढला आहे. त्याशिवाय दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये आज बैठक पार पडणार आहे. त्याआधी ६ जूनला देखील अशीच बैठक पार पडली होती.
चिनी सैन्यानं सीमावर्ती भागात असणाऱ्या हवाई तळांवर अतिरिक्त विमानं आणि हेलिकॉप्टर्स तैनाक केल्यानं भारताला असलेला धोका वाढला आहे. भारतीय हद्दीतील देपसांग, मुर्गो, गलवान, हॉट स्प्रिंग, कोयूल, फुकचे आणि देमचोक चीनपासून जवळ आहेत. चिनी सैन्याच्या हालचालींमुळे मोठं आव्हान निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर आज दोन्ही देशांच्या सैन्याचे कमांडर आज चर्चा करणार आहेत. याआधी ६ जूनला अशाच प्रकारची चर्चा झाली होती.
News English Summary: MiG-29 and Apache helicopters have been deployed in Leh. After this, there has been a strong movement from the Chinese army as well. China has deployed fighter jets along the border from Ladakh to Arunachal Pradesh.
News English Title: China has deployed fighter jets along the border from Ladakh to Arunachal Pradesh News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार