20 April 2025 10:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

भविष्यातील राजकारण | डेटा सायन्स | चीनला जॅक मा नव्हे त्यांच्याकडील ग्राहक डेटा हवाय

China, Consumer data, Alibaba founder Jack Ma, Ant group

बीजिंग, ६ जानेवारी: चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे अब्जाधीश, चीनमधील सर्वात मोठी ऑनलाइन कंपनी असणाऱ्या अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जॅक मा यांनी मागील काही महिन्यांपासून सर्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावलेली नाही. त्यामुळे जॅक मा हे बेपत्ता असल्याचा भीती व्यक्त केली जात आहे. मागील दोन महिन्यांपासून जॅक मा हे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला नाहीत. त्यामुळे त्यांच्यासंदर्भातील वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. (Alibaba founder Jack Ma suspected missing)

जॅक मा यांनी २४ ऑक्टोबर रोजी बीजिंगमध्ये वादग्रस्त भाषण देत चीनच्या नियामक प्रणालीवर टीका केली होती. बँकिंग व्यवस्थेचाही त्यांनी समाचार घेतला होता. या भाषणापासूनच त्यांचं उद्योग साम्राज्य चीन सरकारच्या निशाण्यावर आहे. आजची वित्तीय व्यवस्था ही अत्यंत जुन्या उद्योगावर आधारित आहे. नव्या पिढीसाठी यात निश्चितच बदल केले पाहिजेत, असं जॅक मा म्हणाले होते. मात्र याच संदर्भात धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

भारतासहित जगभरात भविष्यातील राजकारण हे डेटा सायन्स आधारित असेल असं यातील तज्ज्ञ सांगतात. अगदी निवडणुका देखील त्यामुळे सुरक्षित राहतील याची खात्री देता येणार नाही. ज्या व्यक्ती किंवा उद्योगाकडे सार्वधित ग्राहक डेटा असेल तीच व्यक्ती केव्हा समूह हा भविष्यतील सर्वात श्रीमंत व्यक्ती किंवा श्रीमंत उद्योग समूह ठरेल. आज सर्वाधिक महागडा आणि अमूल्य ग्राहक डेटा हा आरोग्य आणि बँकिंग क्षेत्राशी संबंधित आहे. वाढत्या मोबाईलच्या वापरामुळे ग्राहक डेटाबेस हा सर्वच उद्योग समूहांची भूक झाला आहे. त्यात गुगल आणि फेसबुक सारखे सर्वाधिक ग्राहक डेटा असणारे समूह मुकेश अंबानी यांच्या समूहाचा हात धरून भारतात का आले आहेत याचा राजकीय व्यक्तींना किंवा पत्रकारांना देखील सुगावा लागला नसणार. केवळ गुंतवणुकीपर्यंत हा विषय मर्यादित ठेवला गेला आहे. त्याचा प्रत्यय भारतात २०२४ मध्ये नक्कीच येईल. कोविड लसीकरणाच्या नावाखाली आरोग्य डेटा का घेतला जातोय हे अनेकांना समजलं देखील नसणार. परंतु चीन नावाचा देश नेहमीच पुढचा विचार करून नेहमी पुढेच राहतो तर भारतात डेटा सायन्सचा विचार करण्यामागे केवळ राजकीय हेतू दिसत आहे.

अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांच्याकडे ग्राहकांची प्रचंड माहिती आहे. त्यांच्याकडे असलेल्या माहितीचं मोल त्यांच्या संपत्तीइतकंच मोठं आहे. चीनमधील कम्युनिस्ट सरकारला हीच माहिती मा यांच्याकडून हवी आहे. यासाठी सरकारकडून बऱ्याच कालावधीपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र मा यांनी अशा प्रकारचा तपशील देण्यास विरोध केला आहे. जॅक मा यांच्या एंट समूहाकडे कोट्यवधी ग्राहकांचा तपशील आहे. चीनमधील वित्तीय नियामक संस्थेला हा तपशील हवा आहे. त्यासाठी मा यांच्यावर बराच दबाव आणला जात आहे.

एंट समूह ग्राहकांच्या वैयक्तिक तपशीलाचा व्यवसायात गैरवापर करत असल्याचा चीनच्या आर्थिक नियामक संस्थेचा दावा आहे. जॅक मा त्यांच्या अलीपे ऍपच्या मदतीनं लोकांना व्याज देतात. या माध्यमातून मध्यस्थ म्हणून मा यांच्या कंपनीला फायदा मिळतो. मात्र सगळी जोखीम बँकांना पत्करावी लागते. जवळपास ५० कोटी लोक या ऍपचा वापर करतात. या व्यक्तींच्या सवयी, उधार घेण्याची वृत्ती आणि कर्जाची परतफेड या संदर्भातील संपूर्ण तपशील जॅक मा यांच्याकडे आहे.

 

News English Summary: Alibaba founder Jack Ma has a huge customer base. The value of the information they have is as great as their wealth. This is exactly what the Communist government in China wants from Ma. The government has been making efforts for this for a long time. However, Ma has refused to give such details. Jack Ma’s Ant Group has millions of customer details. The financial regulator in China wants the details. There is a lot of pressure on Jack Ma for that.

News English Title: China want huge consumer data available with Alibaba founder Jack Ma Ant group news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#International(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या