22 February 2025 9:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

चिनी सुधरायचे नाही...युलिन शहरात ‘डॉग मीट फेस्टिवल’चं आयोजन

dog meet festival, China, Wuhan, Corona Virus

युलिन, २३ जून : चीनच्या वुहानमधून डिसेंबरमध्ये कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली. पाहता पाहता वुहान शहर हे कोरोनाचं केंद्र झालं होतं. जगात सगळ्यात आधी वुहानमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र कोरोनाचे एकही नवीन प्रकरण न सापडल्यानंतर वुहाननं तब्बल 76 दिवसांनी लॉकडाऊन हटवला. मात्र आता पुन्हा कोरोनानं वुहानमध्ये प्रवेश केला आहे. एवढंच नाही तर वुहानमध्ये पुन्हा एकदा क्लस्टर ट्रान्समिशन दिसून आलं आहे. त्यामुळं आता वुहानमधील सर्व लोकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.

सध्या वुहानमध्ये 6 नवीन कोरोनाची प्रकरणं समोर आली. यामुळं चीन सरकारचे धाबे दणाणले आहेत. वुहानमध्ये पुन्हा कोरोनाची प्रकरणं समोर आल्यानंतर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षानं स्थानिक अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. त्यामुळं आता वुहानमधील तब्बल 1.11 कोटी लोकांची कोरोना चाचणी पुन्हा करण्यात येणार आहे.

असं असलं तरी चीनच्या युलिन शहरातील गुवांग्शी प्रांतामध्ये ‘डॉग मीट फेस्टिवल’ पुन्हा सुरु झाला आहे. कोरोना व्हायरसचा उगम वटवाघुळांपासून झाल्याचे सांगितले जाते. तर वुहानमधील लॅबमध्ये हा व्हायरस तयार केल्याचेही बोलले जाते. एकंदरीत चीनच या व्हायरसचा जन्मदाता असताना आता कोरोना व्हायरसमुळे हा फेस्टिव्हल थांबणार नाही असेही सांगितले जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

चीनवरील पॉलिसी स्पेशालिस्ट पीटर ली यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. ते ह्युमन सोसायटी ऑउ इंटरनॅशनलमध्येही कार्यरत आहेत. त्यांनी ट्विटमध्येम्हटले आहे की, ”युलिन यंदा तरी बदलेल अशी मी आशा व्यक्त करतो. केवळ प्राण्यांसाठी नाही तर आरोग्य आणि सुरक्षेच्या बाबतीतही. एकाच ठिकाणी एकापेक्षा अधिक लोकांनी एकत्र येणे लोकांसाठी धोक्याचे आहे. काही संस्थांनी या फेस्टिव्हलमधून कुत्रे आणि त्यांच्या पिल्लांना वाचविले आहे.”

दरम्यान, चीनमधील एक सामाजिक कार्यकर्ते Zhang Qianqian यांनी सांगितले की, भविष्यात या फेस्टव्हलवर बंदी येऊ शकते. कदाचित हा शेवटचा फेस्टिव्हल असू शकतो. मीट विकणाऱ्या अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर हा निष्कर्ष काढला आहे. काही नेत्यांचेही म्हणणे हेच आहे की बंदी येऊ शकते.

 

News English Summary: The Dog Meat Festival has resumed in Yulin City, Guangxi Province, China. The corona virus is said to have originated from bats. The virus is said to have been created in a lab in Wuhan.

News English Title: Chinese will not improve dog meet festival is started in corona Virus crisis News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x