5 November 2024 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

कोरोनावर 'रेमडेसिवीर' औषध सापडले; अमेरिकेने केला दावा

Corona Crisis, Covid 19, antiviral drug Remdesivir

वॉशिंग्टन, ३० एप्रिल: जगभरातील १८० हून अधिक देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्याने जगभरात २ लाख २७ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. करोना विषाणूवर परिणामकारक ठरणाऱ्या लसीचा शोध घेण्याचा प्रयत्न जगभरातील ८० वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून सुरु असतानाच अमेरिकेमधून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे.

अमेरिकेतील साथरोग नियंत्रण विभागाचे संशोधक एँथनी फॉसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूबाधित रुग्णांना लवकरात लवकर बरे करण्यासाठी रेमडेसिवीर हे औषध प्रभावी ठरते आहे. आतापर्यंत या औषधांचे पाच दिवसांचे आणि दहा दिवसांचे डोस रुग्णांना देऊन त्याची चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीमध्ये असे दिसून आले की ज्या रुग्णांना या औषधाचा १० दिवसांचा डोस देण्यात येतो त्यांच्या प्रकृतीत जेवढी सुधारणा होते. तेवढीच पाच दिवसांचा डोस देणाऱ्या रुग्णांच्या प्रकृतीतही होते आहे.

याआधी वुहानमध्येही हे औषध करोनाबाधितांवर फार परिणामकारक ठरले नव्हते असेही जागतिक आरोग्य संघटनेदेखील एका अभ्यासानंतर म्हटले होते. रेमडेसिवीर औषधाच्या या नव्या माहितीनंतर जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. रेमडेसिवीर औषधांची आणखी काही चाचणी केल्यानंतर हे औषध करोनाबाधितांवर उपचारासाठी वापरण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

२१ फेब्रुवारीपासून अमेरिका, युरोप आणि आशियातील एकूण ६८ ठिकाणी या औषधाची चाचणी एक हजार ६३ रुग्णांवर सुरु होती. अनेक दिवसांच्या चाचणीनंतर हे औषध इतर औषधांच्या तुलनेत करोनावर अधिक प्रभावी असल्याचे समोर आलं आहे. यासंदर्भात बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही ‘सकारात्मक बातमी’ आहे असं म्हटलं आहे.

 

News English Summary: According to Anthony Fossey, a researcher at the Department of Infectious Diseases Control in the United States, the drug remedesivir is effective in curing corona virus patients as quickly as possible. So far, the drug has been tested in five-day and ten-day doses. The test showed that patients who were given the drug for 10 days had a significant improvement in their condition. The same happens in the case of patients who give a five-day dose.

News English Title: Corona crisis antiviral drug Remdesivir could hold promise in fight against Covid 19 Study News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x