22 January 2025 1:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

कोरोना आपत्ती, महागाई, बेरोजगारी | ब्राझीलमध्ये 2 कोटी लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर

Brazil Corona

ब्रासिलिआ, १३ एप्रिल: ब्राझीलमध्ये कोरोना वाढत आहे. एकीकडे हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. स्मशानात जागा शिल्लक नाही. दुसरीकडे, दोन कोटी लोक कोरोनामुळे निर्माण स्थितीमुळे भुकेचा सामना करत आहेत. स्थिती अशी आहे की, एकूण २१.१ कोटी लोकसंख्येपैकी जवळपास अर्ध्या लोकांना व्यवस्थित जेवणही मिळत नाहीये. ब्राझीलच्या अन्न सार्वभौमत्व आणि पोषण सुरक्षा संशोधन नेटवर्कच्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे.

नेटवर्कचे अध्यक्ष रेनाटो मालूफ म्हणतात की, शहरांमध्ये तरी लोक रस्त्यावर येऊन जेवण मागू शकतात. मात्र, गावांमध्ये स्थिती खूपच खराब आहे. कारण, तेथे रस्त्यांवर अन्न द्यायलाही कोणी भेटणार नाही. या स्थितीला कोरोनामुळे वाढलेली बेकारी व जीवनावश्यक वस्तूंच्या दरात झालेली बेसुमार वाढ कारणीभूत असल्याचे तज्ञांचे मत आहे. ब्राझील इन्स्टिट्यूट ऑफ जिओग्राफी अँड स्टॅटिक्सच्या नुसार गेल्या एक वर्षात देशात तांदळाचा भाव ७०%, तर स्वयंपाकाच्या गॅसचे २०% वाढले आहेत.

दरम्यान, कामाच्या शोधात ब्राझीलमधून मोठ्या संख्येने लोक अमेरिकेला जातात. मात्र, कोरोनामुळे त्यांच्यासाठी समस्या निर्माण झाली आहे. तेथे त्यांना लस दिली जात नाहीये. कारण त्यांच्याकडे वाहन परवानासारखे स्थानिक ओळखपत्र नाही. यूएसच्या ५० पैकी १० राज्यांतच अशा लोकांना लस दिली जात आहे.

 

News English Summary: Corona is growing in Brazil. On the one hand, thousands of people are dying. There is no space left in the cemetery. On the other hand, two crore people are facing starvation due to corona formation conditions. The situation is that out of the total population of 21.1 crore, almost half of the people do not even get proper food. A report by Brazil’s Food Sovereignty and Nutrition Security Research Network makes this clear.

News English Title: Corona is growing in Brazil but inflation and unemployment made life difficult news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)#International(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x