5 November 2024 3:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO
x

जगभरात कोरोनामुळे प्रत्येक १५ सेकंदाला एकाचा मृत्यू होत आहे

India, World, Covid19, Corona Virus

नवी दिल्ली, 06 ऑगस्ट : भारतात दररोज करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. २८ जुलैपासून देशामध्ये दररोज ५० हजारपेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद होत आहे. काल बुधवारी एकाच दिवसात तब्बल ५६,२८२ जणांना करोना व्हायरसची लागण झाली. देशात करोना रुग्णांची एकूण संख्या १९ लाख ६४ हजार ५३७ पर्यंत पोहोचली आहे. करोनामुळे आतापर्यंत देशात ४० हजारपेक्षा जास्त नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

महाराष्ट्र (४,६८,२६५), तामिळनाडू (२,७३०००), आंध्र प्रदेश (१,७६,३३३), कर्नाटक (१,५००००) आणि दिल्ली (१,४०,२३२) या पाच राज्यांमध्ये करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. करोनामधून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील लक्षणीय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या डाटानुसार आतापर्यत १२ लाख ८२ हजार २१५ जणा करोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, जगभरात कोरोनाचा कहर कायम आहे. सध्या परिस्थिती एवढी बिकट आहे की, प्रत्येक 15 सेकंदाला एकाचा मृत्यू होत आहे. आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 7 लाख झाली आहे. अमेरिका, ब्राझील, भारत आणि मेक्सिको हे सर्वात जास्त प्रभावी देश आहेत. या देशांमध्ये मृतांची संख्या सर्वात जास्त आहे. अमेरिकेत आतापर्यंत 49 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर, 1 लाख 60 हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या 2 आठवड्यात जगभरातील आकडेवारीतून असे समोर आले आहे की, 24 तासांत 5900 लोकांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ प्रत्येक तासाला 247 आणि प्रत्ये 15 सेकंदात एकाचा मृत्यू होत आहे.

 

News English Summary: Corona’s havoc continues around the world. Currently, the situation is so dire that one person dies every 15 seconds. The death toll from the corona has risen to 7 million worldwide so far. The United States, Brazil, India and Mexico are the most influential countries.

News English Title: Corona virus 7 lakh people died in world at each 15 seconds one person is dead News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x