22 February 2025 7:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch
x

कोरोना आपत्ती: ब्राझीलमध्ये मृतदेह दफन करायला जमीन अपुरी पडत आहे

Brazil, Corona Crisis

ब्राझीलिय, २३ मे : जगात कोरोनानं थैमान घातले आहे. आतापर्यंत ५० लाखांहून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, ३ लाखांहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र आता या मृतांच्या आकड्यावर संशय व्यक्त केला जात आहे. याआधी ब्रिटन आणि चीनवर कोरोना मृतांचा आकडा लपवल्याचा आरोप करण्यात आला होता. आता आणखी एका देशानं कोरोना मृतांचा आकडा लपवल्याचं समोर आलं आहे. हा देश आहे इटली.

चीननंतर इटलीत सर्वात जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र सध्या अमेरिकेत मृतांचा आकडा एक लाखांवर पोहचला आहे. मात्र आता इटलीमध्ये दिलेल्या आकड्यापेक्षा मृतांची संख्या जास्त असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनामुळे इटलीत ३२ हजार लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती सरकारनं दिली. मात्र इटलीच्या राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा एजन्सीने म्हटलं आहे की या मृत्यूची संख्या नोंदलेल्या संख्यापेक्षा १९ हजारपर्यंत जास्त असू शकते.

दुसरीकडे ब्राझीलमध्ये विदारक चित्र असल्याचं पाहायला मिळत आहे. दक्षिण अमेरिकेतील हा देश कोरोनाबाधितांच्या बाबतीत रशियालाही मागे टाकत जगात दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. कोरोनामुळे ब्राझीलची स्थिती एवढी खराब झाली आहे, की तेथील सर्वात मोठ्या स्मशानभूमीतही मृतदेह दफन करण्यासाठी जागा कमी पडत आहे. अनेक लोक तर आपल्या नातलगांचे मृतदेह रस्त्यावर आणि स्मशानभूमीबाहेर सोडून जात आहेत.

यापूर्वी १२ मे रोजी तेथे एकाच दिवसात ८८१ जणांचा मृत्यू झाला होता. ब्राझीलमधील कोरोनाबाधितांचा आकडा आता ३,१९,०००च्याही पुढे गेला आहे. तर २०,५४१ जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होण्याचे प्रमाण एवढे वाढले आहे, की त्यांचे दफन करण्यासाठी स्मशानभूमीत जागाही कमी पडू लागली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्राझीलमधील परिस्थिती आणखी खराब होण्याची शक्यता आहे.

ब्राझीलच्या साओ पाउलो येथे लॅटिन अमेरिकन देशांची सर्वात मोठी स्मशानभूमी आहे. विला फोर्मोसा, असे या स्मशानभूमीचे नाव आहे. या स्मशानभूमीती कर्मचारी आता ८ ऐवजी १२ तासांची ड्यूटी करत आहेत. तरीही सर्व मृतदेह दफन करण्याचे काम अपूर्णच राहत आहे. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसर, एक मृतदेह दफन होत नाही, तोच १५ नवे मृतदेह येत आहेत.

आता तर तेथे रात्रीच्या वेळीही मृतदेह दफन करण्याचे काम सुरू आहे. मात्र, रोजच्या रोज मोठ्या प्रमाणावर मृतदेह येत असल्याने तेथेही जागा कमी पडू लागली आहे. येथे अनेक जण आपल्या कुटुंबीयाचा मृतदेह दफन करण्यासाठी वाट पाहत आहेत. तर अनेक लोक मृतदेह रस्त्यावर आणि स्मशानभूमीबाहेरच सोडून जात आहेत. साओ पाउलो स्मशान भूमीतील हे दृश्य अक्षरश: मन हेलावून टाकणारे आहेत.

 

News English Summary: There is a grim picture in Brazil. The South American country is second only to Russia in the world in terms of coronary artery disease. The corona has made Brazil’s condition so bad that even the largest cemetery in the country lacks space for burial.

News English Title: corona virus Brazil became corona virus hotspot cemetery Sao Paulo has no place dead News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x