26 December 2024 1:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

कोरोनाव्हायरस कमकुवत होत असल्याचा दावा WHO'ने फेटाळला..काय म्हटलं?

Corona virus, not becoming less potent, World Health Organization, Dr Alberto Zangrillo

वॉशिंग्टन, २ जून: कोरोना व्हायरसचे अनेक रुप आहे, असा दावा याआधी देखील जगभरातील अनेक शास्त्रज्ञांनी केला होता. तसेच आता इटलीतील एका तज्ज्ञ डॉक्टरांनीही कोरोनाने आतापर्यत स्वत:मध्ये अनेक बदल केले असून आतादेखील हा विषाणू आपलं रूप बदलू लागला आहे असा दावा केला आहे.

इटलीतील डॉ. अलबर्टो झॅन्ग्रिलो यांनी सांगितलं की, कोरोना व्हायरस आता आपली क्षमता गमावत असून तो कमी प्राणघातक होतो आहे. गेल्या १० दिवसात जे स्वॅब टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोरोना व्हायरसची क्षमत कमजोर पडत असल्याचे दिसून आले आहे, असा खुलासा अलबर्टो झॅन्ग्रिलो यांनी केला आहे.

मात्र जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हे दावे फेटाळले आहेत. तसेच लोकांनी नेहमीप्रमाणे काळजी घेणे आवश्यक असल्याचंही म्हंटलं आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात इटलीमध्ये मोठ्या संख्येनं लोकांचा मृत्यू झाला. इटलीमध्ये आतापर्यंत ३३ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, मात्र नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

मिलानच्या सॅन राफेल हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर अल्बर्टो जंग्रिलो म्हणतात की, क्लिनिकली व्हायरस आता इटलीमध्ये नाही आहे. हे रुग्णालय लॉम्बार्डी शहरात आहे जिथं १६ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. इटलीच्या RAI या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉक्टर अल्बर्टो म्हणाले की, ‘गेल्या १० दिवसांत झालेल्या स्वॅब टेस्टमध्ये व्हायरसचे प्रमाण खूप कमी आहे. एक किंवा दोन महिन्यांपूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण बरेच कमी झाले आहे. ते म्हणाले की संक्रमणाच्या दुसर्‍या टप्प्याबाबत काही तज्ज्ञ चिंतित आहेत आणि नेत्यांनी ते गांभीर्याने घेतलं पाहिजे.

जेनोआ येथील सॅन मार्टिनो हॉस्पिटलमधील संसर्गजन्य आजारांचे प्रमुख, माशिओ बसेटी यांनी असे म्हंटले आहे की, दोन महिन्यांपूर्वी हा विषाणू आता इतका शक्तिशाली होता. तितका आता नाही आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हे दावे फेटाळले आहेत. WHOचे असे म्हणणे आहे की, अशा प्रकारच्या समजुती पसरवू नये की व्हायरस अचानक स्वतःच कमकुवत झाला आहे. तरीही आपण सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

 

News English Summary: The World Health Organization emergencies director Michael Ryan has stressed that the new corona virus has not suddenly become less pathogenic, following claims by an Italian doctor Alberto Zangrillo that Covid-19 had lost some of its potency.

News English Title: Corona virus is not becoming less-potent who says after Italian doctor Alberto Zangrillo claim News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x