28 January 2025 9:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

कोरोनामुक्त झालेला रुग्ण ९० दिवसांपर्यंत पसरवू शकतो कोरोना विषाणू | संशोधन

Corona virus, patients recovered, Corona Virus, Spread infection, 90 days

न्यूयॉर्क, ४ ऑक्टोबर : आपण किंवा आपले मित्र, नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्यांनी कोरोनाच्या आजाराचा विलगीकरण कालावधी पूर्ण केला आहे का? आपण त्यांच्यासोबत राहात आहात का? तर आपल्याला सावध राहण्याची गरज आहे. अमेरिकेच्या विविध रुग्णालयांमधून मिळालेल्या आकड्यांच्या विश्लेषणातून असे समोर आले आहे की COVID-19 रोगाचा SARS CoV-2 हा विषाणू गंभीररित्या संसर्गित झालेल्या रुग्णांच्या शरीरात ९० दिवसांपर्यंत राहू शकतो जे कोरोनामुक्त झाले आहेत.

विलगीकरण प्रक्रियेवर पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखित:
विश्लेषणात अशीही शंका व्यक्त करण्यात आली आहे की कशाप्रकारे असे रुग्ण कोरोनाचा संसर्ग पसरवू शकतात. भारतात आत्तापर्यंत जवळपास ६५ लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर १ लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या संशोधनाने वैद्यकीय कर्मचारी आणि धोरणकर्त्यांना गंभीररित्या आजारी असलेल्या रुग्णांच्या विलगीकरणाच्या कालावधीचे पुनर्मूल्यांकन करण्याची गरज अधोरेखित केली आहे.

सौम्य आणि मध्यम आजारी रुग्ण केवळ १० दिवस संक्रामक असतात. ज्या लोकांमध्ये प्रतिकारकशक्ती तयार होते पण जे मध्यमरुपाने पीडित असतात ते २० दिवसांपर्यंत संक्रामक असतात. कोव्हिड-19चे असे रुग्ण जे गंभीररित्या आजारी असतात ते ९० दिवसांपर्यंत संक्रामक असतात.

असे कोरोनामुक्त लोक १५ मिनिटात इतरांना देऊ शकतात संसर्ग:
अटलांटा यूएसएमध्ये रोग नियंत्रण आणि रोख केंद्रांद्वारे डेटा मूल्यांकनान कोव्हिड-19च्या जोखमींचे आकलन करण्यात आले आहे. अमेरिकी एजन्सीद्वारे केलेल्या मूल्यांकनात आढळून आले आहे की असे कोरोनामुक्त लोक १५ मिनिटात इतरांना संसर्ग देऊ शकतात. यात असेही म्हटले आहे की जर एखादा रोग अशा व्यक्तीला ९० दिवसांनंतर झाला तर तो कोव्हिड-19 नाही.

भारतात अधिक असू शकतो हा धोका:
हे संशोधन विलगीकरणाच्या प्रक्रिया समजून घेण्यासाठी महत्वपूर्ण आहे. केअर हॉस्पिटलच्या हॉस्पिटलचे वरिष्ठ रोग विशेषज्ञ डॉ. मुस्तफा अफजल यांनी सांगितले आहे की स्वास्थ्य कार्यकर्त्यांमध्ये आम्हाला आढळून आले आहे की आरटी-पीसीआर सकारात्मक आहे, पण ते असिम्प्टोमॅटिक आहेत.

रुग्णांच्या प्रत्येक श्रेणीत दर आठवड्याला अँटीबॉडीज स्तराची तपासणी केली जात आहे. यानुसार हे ठरवण्यात येते की त्यांना पुन्हा कामावर घेतले जावे की नाही. भारतात दंडात्मक कारवाई होत असली तरी अनेक लोक मास्क न घातला घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका जास्त वाढतो.

दरम्यान भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोना रुग्णांनी ७५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या ६५ लाखांवर पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत ९४० रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे देशात कोरोना या धोकादायक विषाणूमुळे मृत पावलेल्यांची संख्या १ लाख १ हजार ७८२वर पोहोचली आहे. सध्या देशात करोनाबाधितांची एकूण संख्या ६५ लाख ४९ हजार ३७४ इतकी आहे.

 

News English Summary: Have you or your friends, relatives or family members completed the isolation period of corona virus? Do you live with them? So we need to be careful. Data analysis from various hospitals in the United States of America has shown that the SARS CoV-2 virus of COVID-19 can survive up to 90 days in the body of seriously infected patients. Can remain those who have become corona-free. Accumulating evidence supports ending isolation and precautions for persons with COVID-19 using a symptom-based strategy. This update incorporates recent evidence to inform the duration of isolation and precautions recommended to prevent transmission of SARS-CoV-2 to others, while limiting unnecessary prolonged isolation and unnecessary use of laboratory testing resources.

News English Title: Corona virus patients patients recovered from corona can spread infection up to 90 days Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x