22 December 2024 8:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Alert | हवेतून वेगाने पसरतो कोरोना, 3 देशांतील तज्ञांना याचा ठोस पुरावा सापडला - लँसेट जर्नल

Corona virus

वॉशिंग्टन, १६ एप्रिल: कोरोच्या दुसऱ्या लाटेतील स्थिती अधिक गंभीर आहे. विशेष म्हणजे ब्राझिलमधील या संसर्गाच्या स्फोटाला रोखण्यात अपयश आलं तर संपूर्ण जगात कोरोना स्फोट होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ब्राझिलमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा सातत्याने वाढत आहे. दिवस-रात्र कबरी खोदण्याचं काम सुरु आहे. जेणेकरुन मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांकडून अधिक संसर्ग न होता त्यांच्यावर लगेचच अंत्यसंस्कार करता येतील. ब्राझिल कोरोना मृत्यूंच्या यादीत सर्वात पुढे आहे. रविवारी ब्राझिलमध्ये 37,017 नवे कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळले. तसेच 1,803 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. ब्राझिलमध्ये आतापर्यंत 1 कोटी 34 लाख 82 हजार 543 प्रकरणं समोर आली होती. तसेच एकूण 3 लाख 53 हजार 293 लोकांना आपला जीव गमवावा लागला. जगातील अनेक देशांमध्ये सध्या कोरोनाचा कहर सुरु आहे. मात्र आता कोरोना होण्याची किंवा पसरण्याची इतर कारणही समोर येऊ लागल्याने नक्कीच चिंता वाढणार आहे.

आरोग्याविषयी संशोधन करणार्‍या जगातील सर्वात मोठे वैद्यकीय जर्नल लँसेटने म्हटले आहे की कोरोनाव्हायरस हवेतून पसरतो. आपल्या सर्वेक्षणात जर्नलने असा दावा केला आहे की हवेतून विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे पुष्कळ पुरावे आहेत. ब्रिटेन, अमेरिका आणि कॅनडाच्या सहा तज्ज्ञांनी सांगितले की, हवेपासून विषाणूचा प्रसार झाल्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी जे उपाय केले जात आहेत ते कामी येत नाहीतेय.

तज्ञांनी असे सांगितले आहे की मोठ्या ड्रॉपलेट्सने विषाणूचा सर्वाधिक प्रसार झाल्याचा पुरावा मिळालेला नाही. अशा परिस्थितीत, जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आरोग्य संस्थांनी व्हायरस पसरण्याच्या सांगण्यात आलेल्या कारणामध्ये बदल करावा, जेणेकरुन संक्रमण रोखले जाऊ शकेल.

शोधनाच्या आढाव्यानंतर हवेतून प्रादुर्भाव होण्याच्या दाव्याला बळकटी देण्यासाठी तज्ञांनी काही पुरावे दिले आहेत. यामध्ये टॉपवर एका सुपरस्प्रेडर इव्हेंटचा उल्लेख आहे. यात कागिट चोयर इव्हेंटविषयी सांगितले आहे. यामध्ये एकाच संक्रमितामुळे 53 लोकांमध्ये व्हायरस पसरला आहे. या घटनेच्या संशोधनात हे स्पष्ट झाले की हे लोक एकमेकांजवळ आले नाहीत आणि भेटले देखील नाहीत. याशिवाय पुन्हा त्याच पृष्ठभागाला स्पर्शही झाला नाही. म्हणजेच, व्हायरस या लोकांमध्ये फक्त हवेनेच पसरला.

इनडोरमध्ये ट्रान्समिशन जास्त:
रिसर्चमध्ये सांगितले आहे की, खुल्या ठिकाणांऐवजी बंद ठिकाणी संक्रमण जास्त तेजीने पसरते. खुल्या जागांवर हवा खेळती राहते यामुळे व्हायरस कमी केला जाऊ शकतो.

सायलेंट ट्रान्समिशनने सर्वात जास्त प्रादुर्भाव:
व्हायरसचा सायलेंट ट्रान्समिशन त्या लोकांकडून जास्त होतो, ज्यांच्यात सर्दी, खोकल्याचे लक्षण सापडत नाहीत. व्हायरसच्या एकूण ट्रान्समिशनचा 40% भाग अशा प्रकारच्या संक्रमणानेच होतो. हेच सायलेंट ट्रान्समिशन संपूर्ण जगात व्हायरस पसरण्याचे मुख्य कारण राहिले आहे. याच आधारावर व्हायरस हवेच्या माध्यमातून पसरत असल्याची थेअरी सिद्ध होते.

ड्रॉपलेट्समुळे संक्रमणाचे पुरावे कमी:
संशोधकांनी म्हटले की, ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून व्हायरस तेजीने पसरण्याचे खूप कमी पुरावे मिळाले आहेत. मोठे ड्रॉपलेट्स हवेत थांबू शकत नाहीत आणि हे पडून पृष्ठभागाला संक्रमित करतात. हवेमधून व्हायरस पसरत असल्याचे मजबूत पुरावे सापडले आहेत. अशा प्रकारच्या व्हायरसच्या ट्रान्समिशनसाठी आवश्यक पावले उचलण्याची गरज आहे.

 

News English Summary: The coronavirus is spread through the air, according to the Lancet, the world’s largest medical journal that conducts health research. In its survey, the journal claims that there is ample evidence of airborne viruses. Six experts from the United Kingdom, the United States and Canada said that the spread of the virus from the air was not working.

News English Title: Corona virus spreading through air said latest research report news updates.

हॅशटॅग्स

#International(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x