18 January 2025 6:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

रिचर्ड होर्टन यांचे एक महत्वाचं ट्विट 'उद्या व्हॅक्सीन, फक्त सांगत आहे'

Corona Virus, Covid19, Covid 19 Vaccine, lancet editor

वॉशिंग्टन, २० जुलै : जगभरात कोरोना व्हायरसच्या लसीचे परीक्षण सुरू आहे. आता या लसींचे निकालही समोर येत आहेत. याच साखळीत मॉडर्ना इंकचेही (Moderna Inc.) नाव जोडले गेले आहे. अमेरिकेत सर्व प्रथम परीक्षण केल्या गेलेल्या COVID-19 च्या पहिल्या दोन टप्प्यांवरील परीक्षणाच्या निकालामुळे वैज्ञानिक अत्यंत आनंदात आहेत. त्यामुळे रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने बनवलेली लस मानवी परीक्षणामध्ये यशस्वी ठरलेली असतानाच जगासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कोरोना व्हायरस विरोधात अमेरिकेच्या मॉर्डना कंपनीने विकसित केलेली लसही फेज १ च्या टप्प्यावर यशस्वी ठरली आहे. मॉर्डना कंपनीने विकसित केलेल्या लसीची ४५ तंदुरुस्त स्वयंसेवकांवर चाचणी घेण्यात आली.

एकाबाजूला संपर्ण जग कोरोनाची देवा प्रमाणे वाट बघत आहे. असे असतानाच, आरोग्य क्षेत्रातील जगात सर्वात प्रसिद्ध असलेले साप्ताहिक ‘द लॅन्सेट’चे संपादक रिचर्ड होर्टन यांचे एक ट्विट लोकांत चर्चेचा विषय बनले आहे. रिचर्ड यांनी रिविवारी एक ट्विट केले आहे, की उद्या (म्हणजे आज सोमवारी) कोविड-19 साठी तयार करण्यात येणाऱ्या व्हॅक्सीनच्या परिणामांची घोषणा करण्यात येईल. तेव्हापासून जगाचे डोळे याकडे लागले आहेत.

रिचर्ड होर्टन यांनी ट्विट केले, की ‘उद्या. व्हॅक्सीन. फक्त सांगत आहे.’ त्यांच्या या ट्विटसंदर्भात सोशल मीडियापासून ते जगभरातील देशांत चर्चांना उधाण आले आहे. जर व्हॅक्सीनचे परिणाम घोषित केले गेले आणि ते सकारात्मक असतील, तर ते कुण्या एखाद्या क्रांतीपेक्षा नक्कीच कमी नसतील.

 

News English Summary: Richard Horton tweeted, ‘Tomorrow. Vaccine. Just telling. ‘ His tweets have sparked discussions from social media to countries around the world. If the results of the vaccine were announced and they were positive, those wells would certainly not be less than a revolution.

News English Title: corona virus vaccine results to be out today says lancet editor News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x