पावसाच्या ओलाव्यामुळे कोरोना आणखी पसरु शकतो, जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील शास्त्रज्ञ

वॉशिंग्टन, १ जून: मान्सून भारतात दाखल झाला आहे. हवामान खात्यानेही याची माहिती दिली आहे. पण आता कोरोना विषाणूवर पावसाचा काय परिणाम होतो हे पाहावं लागेल. २०२० चा पाऊस हा कोरोना व्हायरसला सोबत घेऊन जाईल की कोरोना विषाणूला आणखी वाढवेल हे पाहावं लागेल. कोरोना विषाणूवरील पावसाच्या परिणामाबद्दल जगभरातील शास्त्रज्ञ निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
डेलावेअर विद्यापीठाच्या संसर्गजन्य रोग विभागातील शास्त्रज्ञ जेनिफर होर्ने यांनी म्हटले आहे की, पावसाचे पाणी व्हायरस नष्ट करु शकत नाही. यामुळे व्हायरसचा प्रसार कमी होईल असं म्हणता येणार नाही. नुसते हात पाण्याने धुतले तर विषाणू मरणार नाही, साबण लावावाच लागेल. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील अप्लाइड फिजिक्सचे शास्त्रज्ञ जेर्ड इवांस म्हणतात की, ‘पावसात कोरोना विषाणूचा काय परिणाम होईल हे अद्याप कळलेले नाही. तथापि, बहुतेक शास्त्रज्ञांचा असान अंदाज आहे की, पावसाच्या ओलाव्यामुळे व्हायरस आणखी पसरु शकतो.’
पावसामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका वाढेल. वॉशिंग्टन विद्यापीठातील जागतिक आरोग्य, औषध आणि साथीच्या रोगांचे प्राध्यापक जेई बेटेन म्हणतात की, पावसाच्या पाण्यात कोरोनाचा व्हायरस वाहून जावू शकतो. जसं धुळीचे कण पावसात वाहून जातात. बर्याच तज्ञांचे मत आहे की, साबणासारखे निर्जंतुकीकरण करण्यास पाऊस सक्षम नाही. आपण आपले हात पाण्याने धुऊन घेतल्यास व्हायरस मरणार नाही, त्यासाठी आपल्याल हात साबणाने धुवावे लागतील. मेरीलँड युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार, कोरोनाचे विषाणू १७ दिवसानंतर ही आढळून आले आहेत. त्यामुळे पावसामुळे कोरोनाचे विषाणू धुवून निघतील असं म्हणणं चुकीचं ठरेल.
तत्पूर्वी, अमेरिकेच्या हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांचे संशोधन सायन्स जर्नल या जर्नलमध्ये प्रकाशित झाले. विद्यापीठाच्या टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या शास्त्रज्ञांना गंभीर शंका आहे की, या काळात लॉकडाऊन नियम थोडेसे शिथिल केले तर विषाणूचा परिणाम पुन्हा गंभीर रूपात समोर येऊ शकतो. त्याचा मानवी जीवनाला धोका निर्माण होईल. त्यामुळे कोरोनाचं संकट पुन्हा उभं राहिलं असं म्हटलं आहे.
दरम्यान, जगभरातील दोनहून अधिक देशांमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. भारतातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. जगभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत फ्रान्सला मागे टाकून भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यामुळे आता चिंता अधिकच वाढली आहे.
News English Summary: Jared Evans, a scientist in applied physics at Johns Hopkins University in the United States, says: ‘It is not yet known what effect the corona virus will have on rain. However, most scientists are skeptical that rainwater can spread the virus further.
News English Title: corona virus will increase or decrease in monsoon India News latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल