24 November 2024 9:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

लॉकडाऊननंतर कोरोनाची मोठी लाट येऊ शकते; WHO चा इशारा

Coronavirus, Lockdown, World Health Organisation

वॉशिंग्टन, २६ मे: कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉक़ाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र अनेक देशांनी हा लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लॉकडाऊन हटवणाऱ्या निर्णय घेतलेल्या देशांना जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाचा इशारा दिला आहे. जर देशांनी लॉकडाऊन उठवण्यात घाई केली तर कोरोनाचा दुसरा टप्पा येण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवला आहे. काही देशांमध्ये कोरोनाची संख्या कमी होत असली तर मध्य आणि दक्षिण अमेरिका, दक्षिण आशिया आणि अफ्रिका येथील संख्या वाढत आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाऊन उठवण्याची घाई करू नये असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन संचालक डॉक्टर माइक रायन यांनी सांगितलं आहे.

हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात ५० लाखांहून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. ज्या देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे त्यांना इशारा देताना माइक रायन यांनी करोना टप्प्याटप्प्याने येत असल्याचा इशारा दिला आहे. माइक रायन यांनी युरोप आणि नॉर्थ अमेरिका जिथे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत आणि सर्वसामान्य जीवन सुरळीत होत आहे त्यांनाही लोकांच्या सुरक्षेसाठी सर्व काळजी घेण्यास सांगितलं आहे. जेणेकरुन करोनाची दुसरी लाट टाळता येईल असं ते म्हणाले आहेत.

कोरोनाची प्रकरणं कमी झाली याचा अर्थ त्याचा प्रभाव कमी होत जाईल असा विचार करणं चुकीचं आहे. आणि आपल्याकडे दुसरी लाट येण्याआधी तयारीसाठी खूप वेळ आहे असा विचार अजिबात करता कामा नये. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर एका महिन्यात तो पुन्हा वाढू शकतो,” असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे.

 

News English Summary: Lockouts were declared in several countries to prevent the spread of corona. However, many countries have decided to remove this lockdown. But the World Health Organization has issued a stern warning to countries that have decided to end the lockdown.

News English Title: Coronavirus Lockdown Worl Health Organisation Warns Immediate Second Peak News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x