18 January 2025 9:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

कोरोनामुळे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यावर देखील परिणाम - UNO

Covid 19, corona crisis, UNO, psychological suffering

नवी दिल्ली, १५ मे: सध्या जगभर लॉकडाउन झाल्याने अनेकांचा दिनक्रम आणि आयुष्यात जे कधीच अनुभवलं नाही ते आयुष्य जगण्याची वेळ आली आहे. अर्थव्यवस्था कोलमडल्याने अनेक उद्योग बुडतील आणि करोडो लोकं बेरोजगार होण्याची शक्यता यापूर्वीच अनेक संस्थांनी व्यक्त केली आहे. परिणामी सामान्य माणसाच्या एकूण मानसिक स्थितीत देखील मोठे बदल होतील अशी शक्यता संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली आहे. त्यामुळे कोरोनाचा सामना करताना लोकांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे तितकेच गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

तत्पूर्वी युनिसेफने दिलेल्या इशाऱ्यामुळे पालकांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे आरोग्य यंत्रणांवर आलेल्या दबावामुळे नियमित सेवांवर परिणाम झाला आहे. याचा मोठा फटका लहान मुलांना बसू शकतो, असा धोक्याचा इशारा युनिसेफनं दिला आहे. कोरोना संकटाचा जगभरात आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण आला आहे. त्याचा परिणाम लहान मुलांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांवर होण्याची शक्यता आहे. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास आगामी सहा महिने दररोज ६ हजारहून अधिक मुलांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती युनिसेफनं व्यक्त केली आहे.

कोरोना संकटाचा मोठा परिणाम लहान मुलांवर होईल. बालमृत्यूदरात मोठी वाढ होईल. पाच वर्षांखालील मुलांना याचा मोठा फटका बसेल. या मुलांना आरोग्य सेवा देण्यासाठी १.६ अब्ज डॉलरच्या मदतीची आवश्यकता असल्याचं युनिसेफनं म्हटलं आहे. ‘कोरोना संकटामुळे लहान मुलांच्या आरोग्य सेवांवर परिणाम झाला आहे. याबद्दल तत्काळ पावलं न उचलल्यास पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांना मृत्यूचा धोका वाढेल. पुढील ६ महिने दररोज ६ हजारहून अधिक मुलांचा मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे,’ अशी भीती युनिसेफच्या कार्यकारी संचालिका हेन्रिटा फोरे यांनी बोलून दाखवली.

आपण कोरोना नंतरच्या जगाची कल्पना करताना लहान मुलांचं आरोग्य जपण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. हा निधी मिळाल्यास मुलांना सुदृढ राखण्यास मदत होईल, असं फोरे म्हणाल्या. योग्य वेळी मुलांवर आरोग्य सेवा न मिळाल्यास पुढील सहा महिने दररोज ६ हजार मुलं जीव गमावतील, अशी आकडेवारी अमेरिकेतल्या जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांच्या विश्लेषणावर आधारित आहे. लॅन्सेट ग्लोबल हेल्थ नावाच्या मासिकात ही आकडेवारी बुधवारी प्रसिद्ध झाली.

 

News English Summary: The United Nations has expressed the possibility that the corona will also cause major changes in the overall mental state of the common man. That’s why people need to take their mental health seriously when dealing with corona.

News English Title: Covid 19 is not only attacking our physical health but it is also increasing psychological suffering News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x