21 November 2024 7:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

भाड्याने प्रचार? भारतीयांची मतं आकर्षित करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची भाजपशी हात मिळवणी?

US President Donald Trump, PM Narendra Modi, HowDyModi Event, Republican party, Democratic party

टेक्सास: भारत देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य अतुलनीय आहे. भारताच्या नागरिकांनी मोदींना बहुमताने मोठा विजय मिळवून दिला आहे. आज मी आणि मोदी भविष्यातील स्वप्नांचा आनंद साजरा करण्यासाठी पोहोचलो आहोत, असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. मला मोदींनी भारतात बोलावले तर मी नक्की येईल, असेही ट्रम्प म्हणाले. ह्युस्टनमध्ये ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, दोन्ही देशांमध्ये आर्थिक चमत्कार होत आहेत. अमेरिकेत भारतीय लोक क्रांतिकारी टेक्नॉलॉजी आणत आहेत. भारताकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत आहे. आम्ही याचे स्वागत करतो, असेही ट्रम्प म्हणाले. दरम्यान, ह्युस्टनमध्ये गुजराती समुदायाचे समर्थन प्राप्त करण्यासाठी भाजपचे ३२० आमदार आणि काही खासदार यापूर्वीच ह्युस्टनमध्ये दाखल झाले होते. अमेरिकेतील डेमोक्रॅटिक या विरोधी पक्षातील वरिष्ठ सदस्य स्टेनी होयरसह ६० पेक्षा अधिक अमेरिकी संसद सदस्य यावेळी सहभागी झाल्याचे वृत्त होते.

ट्रम्प पुढे म्हणाले की, भारत आणि अमेरिका सोबत मिळून चांगले काम करेल. अमेरिकेत भारतीय कंपन्या लाखो लोकांना रोजगार देत आहेत. भारतीय लोक अमेरिकेला मजबूत करत आहेत, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प पुढे म्हणाले की, भारत आणि अमेरिका सोबत मिळून चांगले काम करेल. अमेरिकेत भारतीय कंपन्या लाखो लोकांना रोजगार देत आहेत. भारतीय लोक अमेरिकेला मजबूत करत आहेत, असे ट्रम्प म्हणाले.

दरम्यान अमेरिकेत वर्षभरात राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आहेत आणि त्यामुळे ट्रम्प ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात त्या रिपब्लिकन पक्षासाठी भारतीयांचे प्राबल्य असलेल्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन डल्लास या शहरातील भारतीय वंशाच्या लोकांचा पाठिंबा अत्यंत महत्वाचा आहे. कारण २०१६ मधील अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी डेमोक्रॅटिक पक्षातील उमेदवार हिलरी क्लिंटन यांना याच शहरातील ७५ टक्के भारतीय वंशाच्या मतदाराने भरभरून मतदान केलं होतं.

२०२०मधल्या अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकीची बीज ट्रम्प प्रशासनाने २०१९च्या मे महिन्यातच रोवली होती आणि त्यानंतर पुढील रणनीती आखली गेल्याचं तिथल्या राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे. त्यानुसार अमेरिकेत मागील अनेक वर्ष तापवलेल्या स्थलांतरितांच्या मुद्याला तीरांजली देत विदेशी नागरिकांच्या अमेरिकेतील कायम वास्तव्यासाठी ग्रीन कार्ड विषय पुढे केला. त्यानुसार जुनी पद्धत बंद करण्यात आणि त्याऐवजी ‘बिल्ड अमेरिका व्हिसा’ पद्धत लागू करण्याचे तेथील ट्रम्प प्रशासनाने निश्चित केले आणि इतर देशातील मतदारांना खुश केले.

त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, जगातील कोणत्याही माणसाला अमेरिकेत येण्यास बंदी नसेल. तुम्ही कोणत्याही देशात जन्मलेले असा तुमच्याशी कसलाही भेदभाव न करता तुम्हाला अमेरिकेत कायम स्वरूपी राहण्यासाठी ही नवीन व्हिसा पद्धत सुरू केली जाणार आहे. परंतु आता केवळ लॉटरी पद्धतीने नव्हे किंवा तुम्ही कोणाचे नातेवाईक आहात म्हणून नव्हे तर तुम्हाला अवगत असलेल्या उच्च दर्जाचे कौशल्य आणि तुमच्या गुणवत्तेच्या आधारावरच तुम्हाला अमेरिकेचा कायम वास्तव्याचा व्हिसा जारी केला जाईल असं निश्चित केलं आहे.

कारण २०१६ मधील निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध तिथले भारतीय एकवटले होते, कारण ट्रम्प यांनी इतर देशातील स्थलांतरित अमेरिकन लोकांच्या नोकऱ्या बळकावत हा मुद्दा २०१६ मधील निवडणुकीत प्रतिष्ठेचा केला होता. अमेरिकेत २००९ मध्ये स्थलांतरित मेक्सिकन लोकांची संख्या सर्वाधिक होती. मात्र २०१४ मध्ये अमेरिकेत स्थायिक होणाऱ्या भारतीय लोकांची संख्या सर्वाधिक वाढली आणि मेक्सिको देखील तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. त्यामुळे अमेरिकेत २०१६ साली झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीयांनी हिलरी क्लिंटन यांना भरभरून मतदान केलं होतं. त्यामुळे २०१६ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुका ट्रम्प यांच्या रिपब्लिक पक्षासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्यासाठीच ट्रम्प यांच्या पक्षातील याच भागातील सदस्य मोदींच्या आडून रणनीती आखात आहेत. भारताच्या राजकारणात जे महत्व उत्तर प्रदेशाला आहे, तेच महत्व अमेरिकेतील टेक्सास राज्याला असल्याने ट्रम्प आणि त्यांच्या टीमने येथे विशेष लक्ष दिलं आहे.

एकूण भाजप आणि ट्रम्प यांच्यामध्ये एक छुपा करार झाला असल्याची शक्यता तिथल्या राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. टेक्सास राज्यात गुजराती समाज मोठ्या प्रमाणावर स्थायिक असून इतर भाषिक देखील मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्यामुळेच मोदींसोबत देशातील विविध राज्यातील तब्बल ३२० भाजप आमदारांची आणि काही खासदारांची फौज देखील तेथे हजर झाली होती आणि रिपब्लिकन’साठी आपापल्या समाजामध्ये वातावरण निर्मिती करणे हा त्यामागचा छुपा अजेंडा असल्याचं म्हटल्याचे जातं आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर इव्हेन्ट करून भारतात आणि अमेरिकेत वेगळी वातावरण निर्मिती केली जाते आहे. आधुनिक रशियन एस-४०० या क्षेपणास्त्र विरोधी युद्ध सामुग्रीवरून भारत सरकारवर आगपाखड करणारे ट्रम्प अचानक प्रेमळ झाले असून, २०१८ मध्ये भारताच्या स्वतंत्रता दिवसाच्या विशेष निमंत्रणाला भारतात येण्यास नकार देणारे ट्रम्प सध्या जाहीरपणे मोदींनी मला भारतात बोलाविल्यास नकीच येईन असं सांगत आहेत. भारतात महागाई, बेरोजगारी, नवे रोजगार, मानवी मूल्यांची पायमल्ली, महिला विषयक अत्याचार, अल्पसंख्यांकांवरील हल्ले आणि डॉलरच्या तुलनेत घटलेली रुपयाची किंमत भारतातील वास्तव सांगते. मात्र सध्या ट्रम्प यांना त्याचाशी काही देणं घेणं नसून ते देखील राजकीय फायद्यासाठी मोदींची स्तुती करतील अशीच शक्यता होती.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x