23 November 2024 3:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

Instagram is Toxic For Girls | इन्स्टाग्राम ठरते आहे मुलींमध्ये संकोच आणि तणाव वाढवणारे साधन - मोठा खुलासा

Instagram toxic for teen Girls

वॉशिंग्टन, १८ सप्टेंबर | फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म “इन्स्टाग्राम’ मुलींमध्ये संकोच आणि तणाव वाढवणारे एक साधन ठरत आहे. या प्लॅटफॉर्मची मालकी असलेली कंपनी फेसबुकलाही याबाबत सर्व माहिती आहे. परंतु, फेसबुकने याबाबतच्या अंतर्गत अहवालांकडे केवळ दुर्लक्ष केले असे नाही, तर हे अहवाल दाबून टाकण्याचा प्रयत्न केला.

Instagram is Toxic For Girls, इन्स्टाग्राम ठरते आहे मुलींमध्ये संकोच आणि तणाव वाढवणारे साधन – Facebook knows Instagram is toxic for teen Girls company documents show says Washington Post :

फेसबुकच्या याच अंतर्गत अहवालाच्या आधारे अमेरिकी वृत्तपत्र “वॉल स्ट्रीट जर्नल’ने हा पर्दाफाश केला आहे. या वृत्तमालिकेत नमूद करण्यात आले आहे की, फेसबुक आपल्याच नियम व निकषांचे उल्लंघन करत आहे. या अहवालात फेसबुकच्या माजी कर्मचाऱ्यांची वक्तव्ये नोंद आहेत. त्यांनी हे इन्स्टाग्राम व्यासपीठ नि:पक्ष नसल्याचे म्हटले आहे. अहवालात म्हटले आहे की, मुलींच्या स्वत:च्या शरीराबद्दलचे विचार आपण एवढ्या वाईट स्तरावर नेले आहेत की यामुळे मुलींमध्ये संकोच आणि तणाव वाढत चालला आहे. याला सर्वस्वी इन्स्टाग्रामच जबाबदार आहे. दरम्यान, याबाबत फेसबुकच्या वतीने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. विचार मांडण्याचे स्वातंत्र्य देणाऱ्या सोशल मीडियातील माध्यमांबद्दल वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या या बातम्यांमुळे खळबळ उडाली आहे.

Instagram says it’s working on body image issue after report details ‘Toxic’ effect on teen girls :

झुकेरबर्ग फेसबुक नि:पक्ष असल्याचे सांगतात, पण तेही खोटेच:
या वृत्तपत्रानुसार, फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग आपली व्यासपीठे नि:पक्ष असल्याचे सांगतात. परंतु, हे अगदी असत्य आहे. २०१९ च्याच आणखी एका अंतर्गत अहवालानुसार, कंपनीने व्हाइटलिस्टिंग पॉलिसी तयार केली आहे. यानुसार, काही विशिष्ट गट, संघटना, व्यक्तींना विश्वासपात्र मानले जाते. यात बहुतांश बडे नेते, सार्वजनिक क्षेत्रातील नामांकित लोक असतात. त्यांना नियम मोडण्याची अगदी सूट असते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Facebook knows Instagram is toxic for teen Girls company documents show says Washington Post.

हॅशटॅग्स

#Instagram(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x