18 January 2025 4:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

फ्रान्समध्ये तिसऱ्या कोरोना लाटेची शक्यता | एक महिन्याच्या लॉकडाउनची घोषणा

France Prime Minister, Lockdown announced, Covid 19

पॅरिस, १९ मार्च: देशातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व राज्यांमध्ये सुरु असलेल्या लसीकरण मोहीमेचे कौतुक केले. तसेच राज्यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ठोस योजना तयार करुन कामाला लागावे, असे निर्देश पंतप्रधान मोदींनी दिले.

भारत गेल्या वर्षभरापासून कोरोनाविरुद्ध लढत आहे. आपण ज्याप्रकारे कोरोनाशी लढत आहोत तो जगासाठी एक आदर्श वस्तुपाठ झाला आहे. आजच्या घडीला देशभरात 96 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील मृत्यूदरही कमी असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. मात्र, कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी त्यांनी राज्यांना काही उपायही सांगितले. दरम्यान भारतात जेव्हा दुसऱ्या लाटेची चर्चा रंगली आहे तिकडे युरोपमध्ये तिसऱ्या लाटेच्या चर्चा सुरु होऊन त्यावर नवी नियमावली लागू करण्यात आली आहे.

फ्रान्समध्ये देखील वाढती करोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊ पंतप्रधान जीन कैस्टेक्स यांनी मर्यादित लॉकडाउनची घोषणा केलीय. पंतप्रधानांनी गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर पॅरिससहीत देशातील १६ ठिकाणी एका महिन्यांच्या लॉकडाउनची घोषणा केलीय. सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी मध्यरात्रीपासून चार आठवड्यांसाठी हा लॉकडाउन लागू होणार आहे. नवीन लॉकडाउनमध्ये मार्च आणि नोव्हेंबरमधील आधीच्या लॉकडाउनसारखे कठोर निर्बंध नसतील. शाळा आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांना सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

या लॉकडाउनमध्ये लोकांना घराबाहेर पडता येणार आहे. मात्र मित्रांच्या घरी जाऊन पार्टी करणे, सोशल डिस्टन्सींगचे नियम न पाळणे, मास्क न घालण्यासाठी हा लॉकडाउन लागू करण्यात आलेला नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं,” अशा शब्दांमध्ये पंतप्रधानांनी नियम न पाळणाऱ्यांचे कान टोचले आहेत. नवीन नियमांनुसार जास्तीत जास्त लोकांनी वर्क फ्रॉम होम पर्याय निवडावा असं सांगण्यात आलं आहे.

 

News English Summary: In France, too, Prime Minister Jean-Castex announced a limited lockdown in response to the rising number of coroners. The Prime Minister announced a month-long lockdown in 16 places across the country, including Paris, after a review meeting on Thursday. According to CNN, the lockdown will be in effect for four weeks from midnight on Friday.

News English Title: France Prime Minister announced a month long lockdown in 16 places across the country news updates.

हॅशटॅग्स

#International(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x