5 November 2024 4:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

सुदानमध्ये कारखान्यातील स्फोटात १८ भारतीय कामगारांचा मृत्यू

Sudan country, Blast in Factory

सुदान: सुदानमधील सिरॅमिक कारखान्यात झालेल्या एलपीजी टँकरच्या शक्तीशाली स्फोटात २३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १८ भारतीय आहेत. या स्फोटामध्ये १३० जण जखमी झाले आहेत. सुदानमधील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली आहे. सध्या ७ भारतीय कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर या स्फोटात बचावलेल्या ३४ भारतीय कामगारांना सलुमी सिरामिक फॅक्ट्री रेसिडेन्समध्ये ठेवण्यात आले आहे. स्फोटानंतर फॅक्ट्रीतील १६ भारतीय कामगार बेपत्ता असल्याचंही सांगण्यात येतं. त्यामुळे या कामगारांचं काय झालं? हे कामगार सुद्धा आगीत होरपळले का? असे प्रश्न विचारले जात आहेत.

सुदानमधील दूतावासाने दिलेल्या माहितीनूसार मंगळवारी एलपीजी सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये २३ नागरिकांचा मृत्यू झाला असून यामध्ये 18 भारतीयांचा समावेश असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. तसेच १३० जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपरचारासाठी स्थानिक रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

जयशंकर यांनी भारतीयांसाठी एक आपत्कालीन नंबर जारी केला असून हा नंबर चोवीस तास कार्यरत राहणार आहे. भारतीय दुतावासातील प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले आहेत. दुतावासाने +२४९-९२१९१७४७१ हा आपत्कालिन क्रमांक जारी केला आहे. या शिवाय दुतावासाकडून समाज माध्यमांवरही माहिती दिली जात आहे. कामगारांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, असं जयशंकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x