15 January 2025 9:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

निवडणुकीत माझा पराभव झाला तर कदाचित मला देशही सोडावा लागेल - डोनाल्ड ट्रम्प

US President Donald Trump, Presidential Election 2020 Campaign

वॉशिंग्टन, १८ ऑक्टोबर : अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसं रिपब्लिकन आणि डेमोक्रेट पक्षांचे दोन्ही प्रमुख उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि जो बाइडन हे आपला निवडणूक प्रचार आणखी धारदार करताना दिसत आहेत. हे दोन्ही नेते एकमेकांवर तीव्र शाब्दिक हल्ला करताना दिसत आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीतील त्यांचे प्रतिस्पर्धी आणि डेमोक्रॅट पक्षाचे बाइडन हे इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात वाईट उमेदवार असल्याचं म्हटलं आहे. ‘अशा उमेदवाराविरूद्ध लढणे हा एक प्रकारे दबाव असून जर माझा पराभव झाला तर कदाचित मला देशही सोडावा लागेल.’ असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं आहे.

फ्लोरिडा आणि जॉर्जियातील निवडणूक सभांना संबोधित करताना ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं. ट्रम्प यांच्या भाषणातूनही हे सिद्ध झाले की, निवडणुकीत आपला विजय होईलच याची त्यांना खात्री नाही. आपल्या भाषणादरम्यान ते म्हणाले, ‘अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या इतिहासातील सर्वात वाईट उमेदवाराविरूद्ध लढण्यासाठी माझ्यावर दबाव आहे. मी हरवल्यास काय होईल याची कल्पना करू शकता? मला कदाचित देश सोडावा लागेल. मग मला माहित नाही की, काय होईल.’

 

News English Summary: President Donald Trump fought Friday to recover from sinking election polls by campaigning with a hardline pitch to America’s right wing, claiming at rallies in Florida and Georgia that his Democratic opponent Joe Biden would deliver communism and a “flood” of criminal immigrants. He also seemed to acknowledge things might not go his way in the end. “Running against the worst candidate in the history of presidential politics puts pressure on me. Could you imagine if I lose?,” Trump mused. “What am I gonna do?,” he continued. “I’m not gonna feel so good. Maybe I’ll have to leave the country. I don’t know.”

News English Title: If I will lose the election I may have to leave the country said US President Donald Trump during campaign News updates.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x