18 January 2025 6:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

आज आपण झुकलो तर उद्या आपल्या मुलांना चीनसमोर दयेची भीक मागावी लागेल - माईक पॉम्पेओ

Chinese government, our freedom, Mike Pompeo

वॉशिंग्टन, २४ जुलै : कोरोना व्हायरसमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. संबंध बिघडल्यापासून अमेरिका चीनला सातत्याने धक्के देत आहे. आता ट्रम्प सरकार चीनला यूएस डॉलर सिस्टममधून (SWIFT) बाहेर काढण्याची अथवा त्याचा अ‍ॅक्सेस कमी करण्याची शक्यता आहे. चिनी वृत्तपत्र साउथ चायना मॉर्निंग पोस्टमधील एका वृत्तानुसार, अमेरिका अशा प्रकारचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. यामुळे बिजिंगची चिंता वाढली आहे.

सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनांशिअल टेलिकम्युनिकेशन (SWIFT) एक नेटवर्क आहे. याचा वापर जगभरातील बँकांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती देण्यासाठी अथवा मिळवण्यासाठी केला जातो. ज्या पायाभूत सुविधांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणुकीत अमेरिन डॉलरची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, अशा पायाभूत सुविधांचा हा भाग आहे.

वैश्विक दृष्ट्या बँकांचे अमेरिकन बँकांशी संबंध आहेत. याच माध्यमातून त्या अमेरिकन डॉलरचे ट्रांजेक्शन करतात. याच पेमेन्ट सिस्टिमच्या माध्यमाने व्हाईट हाऊस अमेरिकन बँकांना एखादी व्यक्ती, संस्था अथवा देशाशी व्यवहार थांबवण्याचा आदेश देऊ शकते. तसेच, शिनजियांग आणि हाँगकाँग मुद्यावरून संपूर्ण जगाचा विरोध होत असल्याने चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष चिंतेत आहे.

दुसरीकडे अमेरिकेकडून नुकताच ह्युस्टनमधील चिनी दुतावास खाली करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यामुळे चीनचा पारा चांगलाच चढला होता. यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी पुन्हा एकदा चीनवर टीका केली आहे. आज आपण काही पावले उचलली नाही तर चिनी सरकार आपले स्वातंत्र्य हिरावून घेईल. आपण इतक्या वर्षांच्या मेहनतीने उभी केलेली नियमाधारित व्यवस्था मोडीत काढेल. त्यामुळे आज आपण त्यांच्यासमोर झुकलो तर उद्या आपल्या मुलांना चीनकडे दयेची भीक मागण्याची वेळ येईल, असे माईक पॉम्पेओ यांनी म्हटले.

चीन ही मुक्त जगासमोरील सध्याची प्रमुख समस्या आहे. आम्ही एकट्याने या आव्हानाचा सामना करु शकत नाही. संयुक्त राष्ट्रसंघ, नाटो, जी७, जी २० या सगळ्यांच्या रुपाने असलेली आर्थिक, राजनैतिक आणि लष्करी ताकद यासाठी गरजेची असेल. मात्र, या सगळ्यावर अमेरिकेचे थेट नियंत्रण असणे गरजेचे आहे. कदाचित आता आमच्याप्रमाणे विचार करणाऱ्या लोकशाही देशांची एकत्रित मोट बांधण्याची वेळ आली आल्याचेही माईक पॉम्पेओ यांनी सांगितले.

तसेच येणाऱ्या काळात अमेरिकेकडून चीनसाठी अविश्वास आणि खातरजमा करण्याचे धोरण अवलंबिले जाईल. यापूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी रशियाच्याबाबतीत खातरजामा केल्यानंतर विश्वास ठेवण्याचे Turst but Verify धोरण वापरल्याची आठवण माईक पॉम्पेओ यांनी करुन दिली.

 

News English Summary: If we do not take action today, the Chinese government will take away our freedom. You will break the rules that you have built after so many years of hard work. So if we bow to them today, tomorrow will be the time for our children to beg for mercy from China, ”said Mike Pompeo.

News English Title: If we do not take action today, the Chinese government will take away our freedom says Mike Pompeo News latest Updates.

हॅशटॅग्स

#China(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x