5 November 2024 2:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015 Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी - NSE: TATAPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 55% पर्यंत परतावा मिळेल - NSE: HAL Bank Account Alert | पगारदारांना 'या' 5 फायनान्शियल चुका पडू शकतात महागात, कधीच पैसा-संपत्ती वाढणार नाही - Marathi News
x

अनेकांना प्रश्न | तालिबान्यांच्या कब्जानंतर आता भविष्यात अफगाणिस्तानात नेमकं काय होणार? - वाचा सविस्तर

Taliban in Afghanistan

काबुल, १८ ऑगस्ट | अमेरिका आणि नाटोच्या फौजा तब्बल २० वर्षांच्या मुक्कामानंतर अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्या. त्यानंतर तालिबाननं अख्खा अफगाणिस्तानच आपल्या बंदुकीच्या दहशतीखाली आणला आहे. अनेक नागरीकांनी देश सोडला आहे. राष्ट्रपतींसह अनेक राजकीय नेते देशातून पळून गेले आहेत. दरम्यान, तालिबान्यांनी देशावर पूर्णपणे नियंत्रण ठेवले आहे. रविवारी रात्री राजधानी काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने मंगळवारी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्यासाठी सांगितले आहे. तालिबानने कर्मचाऱ्यांना ‘माफी’ दिली आहे. अशा स्थितीत आपण पूर्ण विश्वासाने आपली दिनचर्या सुरू करू शकता, असे तालिबानने म्हटले आहे. राजधानी काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानी उत्सव साजरा करत आहेत. तालिबानी अतिरेक्यांनी काबूलमधील राष्ट्रपती भवनावर कब्जा केला आहे. काबूलच्या रस्त्यावर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अफगाणिस्तानात काय चालले आहे?
तालिबान हा एक अतिरेकी गट आहे. 1990 च्या उत्तरार्धातच त्याने देशावर राज्य केले होते. तो आता अफगाणिस्तानातील एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास आला आहे आणि त्याने देशाचा ताबा मिळवला आहे. 2001 मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानात हल्ले सुरू केले. अतिरेक्यांना सत्तेतून बेदखल केले गेले. यानंतर अमेरिकन सैनिक तेथून परत आले नाहीत. दोन दशक तिथेच लढा देत राहिले. अमेरिका आणि त्याच्या सहयोगी नाटो सैन्याने काबूल सोडण्याची तयारी केली तेव्हा पाश्चिमात्य देशांच्या पाठिंब्याने 20 वर्षांपासून सत्तेत असलले सरकार पायउतार झाले. आता अफगाण लोकांना त्यांचे भविष्य अंधारात दिसत आहे. ते अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी विमानतळाच्या दिशेने धावत आहेत. त्यांना या देशातून बाहेर पडण्याचा हाच शेवटचा मार्ग म्हणून दिसतोय.

लोक अफगाणिस्तानातून पळून जाणं का पसंत करत आहेत?
अफगाण लोकांना चिंता अशी आहे की, तालिबानच्या हातात सत्ता आल्याने पुन्हा अराजकाचे वातावरण होईल. अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या सरकारमध्ये काम करणाऱ्यांचा सूड घेतला जाईल. अनेकांना भीती आहे की, तालिबान कठोर इस्लामिक कायदे लागू करतील. 1996 ते 2001 दरम्यान त्यांनी आपल्या राजवटीत तत्सम कायदे अंमलात आणले होते. याच दरम्यान तालिबानने शिक्षा देण्यासाठी इस्लामिक पद्धतीचे कायदे देशात लागू केले. यामध्ये हत्या आणि अत्याचाराचे आरोप असलेल्या दोषींना सार्वजनिकरित्या फासावर लटकवणे, चोरीच्या प्रकरणातील दोषींचे अवयव कापणे, अशा प्रकारच्या शिक्षांचा समावेश होता.

पुरुषांनी दाढी वाढवणे आणि महिलांनी संपूर्ण शरीर झाकणाऱ्या बुरख्याचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले होते. तालिबानने टीव्ही, संगीत आणि सिनेमा यांच्यावर बंदी घातली होती. 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलींनी शाळेत जाण्यावर बंदी घालण्यात आली. महिलांना घराबाहेर पडताना पुरुष नातेवाईकाला सोबत न्यावे लागत असे. पण मगाील काही वर्षांत तालिबानने स्वतःचा मॉडरेट चेहरा दाखवला आहे. ते सूड घेणार नाही असेही म्हटले आहे. तरीदेखील अफगाण लोकांचा तालिबानवर विश्वास नाही.

तालिबानने अफगाणिस्तानला टेकओव्हर का केले?
याचे एक मोठे कारण म्हणजे अमेरिकन सैन्य या महिन्याच्या अखेरीस म्हणजे ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानातून बाहेर पडेल. अमेरिकन सैन्याची माघार मे महिन्यात सुरू झाली होती. अमेरिकेने 11 सप्टेंबर 2001 रोजी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांविरोधात वॉर ऑन टेरर म्हणजे दहशतवादाविरुद्ध युद्ध सुरू केले होते. या हल्ल्याला जबाबदार असलेल्या अल-कायदावर तालिबानने कारवाई केली नाही. एवढेच काय, तर त्याला पाठिशी घातले. याचा राग म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला. काही महिन्यांतच तालिबान्यांना देशातून हद्दपार करण्यात आले. अमेरिकेला सततचे युद्ध आणि देशाची पुनर्बांधणी करणे खूप अवघड झाले.

जेव्हा अमेरिकेचे लक्ष इराककडे गेले तेव्हा तालिबान पुन्हा इथे सक्रिय झाला. गेल्या काही वर्षांत त्याने अफगाणिस्तानचे अनेक प्रांत काबीज केले होते. गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याची घोषणा केली होती. त्याने तालिबानशी करारही केला. तालिबानविरुद्ध मर्यादित लष्करी कारवाईवर ते सहमत झाले. यानंतर, राष्ट्राध्यक्ष झालेल्या जो बायडेन यांनी ऑगस्टच्या अखेरीस अमेरिकन सैन्य परत येत असल्याची घोषणा केली. ही तारीख जवळ येता येता तालिबानने त्यांचे हल्ले तीव्र केले आणि ते वेगाने आपले पाय पसरु लागले. रविवारी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूल ताब्यात घेऊन आपले वर्चस्व सिद्ध केले.

अफगाण सैन्याचे प्रमाण तालिबानपेक्षा दुप्पट असताना देखील त्यांनी पळ का काढला?
याचे थोडक्यात उत्तर म्हणजे भ्रष्टाचार. म्हणूनच 70-80 हजार तालिबानी अफगाणिस्तान लष्कराच्या 3 लाख सैनिकांवर भारी पडले. अमेरिका आणि नाटोच्या मित्र राष्ट्रांनी अफगाण सुरक्षा दलांना प्रशिक्षण देण्यासाठी मागील दोन दशकांत अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत. तीन लाखांहून अधिक अफगाण सैनिक, अब्जावधी डॉलरची शस्त्रे अफगाण सैनिकांकडे होती. तालिबानपेक्षा अफगाणिस्तानच्या सैनिकांची कुमक आणि शस्त्रसज्जता किमान कागदावर तालिबानपेक्षा अधिक होती. मात्र, भ्रष्टाचार, अनुभवहीन नेतृत्व, प्रशिक्षणाचा अभाव आणि दीर्घ काळापासून सुरू असलेल्या संघर्षामुळे ढासळलेले नीतीधैर्य या अफगाण सैनिकांच्या कमकुवत बाजू होत्या. पाश्चिमात्य देशांच्या पाठिंब्याने स्थापन झालेल्या सरकारने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला. कमांडरांनी परदेशी पैशाचा फायदा घेतला आणि सैनिकांची संख्या वाढवून सांगितली.

अमेरिकेची सैन्य मागे घेण्याच्या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली, तेव्हा अफगाण सैन्य निराश झाले.अफगाणिस्तानच्या सैनिकांनी सुरुवातीला दक्षिणेकडील लष्कर गाहसारख्या ठिकाणी तालिबानशी लढा देण्याचा नेटाने प्रयत्न केला. मात्र, या वेळी त्यांना अमेरिकेच्या हवाई हल्ल्याचे आणि लष्कराचे साह्य नव्हते. संख्येने लहान असले, तरी अधिक संघटित आणि मूलतत्त्ववादी भावनेने प्रेरित असलेल्या तालिबानशी दीर्घ काळ लढा देणे अफगाण सैनिकांना जमले नाही. अफगाण लष्कराने तालिबानसमोर अक्षरश: शस्त्रांसह शरणागती पत्करली. काही ठिकाणी लष्कराची पूर्ण युनिटही तालिबानला शरण गेली.

आता अफगाणिस्तानात काय होईल?
अद्याप काहीही स्पष्ट नाही. तालिबान म्हणतो – इतर गटांसोबत मिळून आम्ही ‘सर्वसमावेशक इस्लामिक सरकार’ बनवू. यासाठी आम्ही जुन्या सरकारच्या नेत्यांसह देशातील वरिष्ठ नेत्यांचा सल्ला घेत आहोत. तालिबानने इस्लामिक कायदा लागू करण्याचे म्हटले आहे. सोबतच अनेक दशकांच्या युद्धानंतर सामान्य जनजीवन परत येण्यासाठी सुरक्षित वातावरण प्रदान करणार असल्याचा शब्ददेखील दिला आहे. मात्र, अफगाण जनतेचा तालिबानवर विश्वास नाही. त्यांना भीती वाटते की तालिबान राजवट हिंसक असेल. तालिबानला अफगाणिस्तानचे नाव बदलून इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान करायचे आहे. यामुळे देखील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील वेळी तालिबानने त्याच नावाने राज्य केले होते.

या वर्षाच्या सुरुवातीला, पेंटागॉनच्या महत्त्वाच्या नेत्यांनी सांगितले होते की, अल-कायदा सारखे कट्टरपंथी गट पुन्हा उदयास येऊ शकतात. पण सद्यपरिस्थिती बघता असे गट अपेक्षेपेक्षा वेगाने वाढू शकतात. अफगाणिस्तान इस्लामिक स्टेटशी संबंधित गटांचे घर आहे. अलिकडच्या वर्षांत त्याने शिया अल्पसंख्याक समुदायावरील हल्ले तीव्र केले. तालिबानने या हल्ल्यांचा निषेध केला. क्षेत्र ताब्यात घेण्यावरून दोन्ही गट आपापसात भांडत आहेत. तालिबान सरकार इस्लामिक स्टेटला दडपण्याचे धोरण अंमलात आणते का हे पाहणे बाकी आहे.

पूर्व आणि विद्यमान इतिहास भयानक असल्याने कोणीही गुंतवणूक करणार नाही:
मागील काही वर्षात अमेरिकन आणि युरोपियन देशांनी अफगाणिस्तानच्या उभारणीसाठी अरबो रुपये खर्च केले आहेत. तसेच भारताने देखील त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा दिला होता. मात्र आता त्या सर्व उभारलेल्या पायाभूत सुविधांसहित, प्रशासकीय यंत्रणा तसेच अत्याधुनिक हत्यारांसहित संपूर्ण अफगाणिस्थानवर तालिबानने कब्जा केला आहे. त्यामुळे ते आता पूर्वीपेक्षा १०० पट ताकदवान झाले आहेत. मात्र त्यांच्या पूर्व आणि विद्यमान इतिहास भयानक असल्याने भविष्यात येथे कोणीही गुंतवणूक करणार नाहीत हे स्पष्ट आहे. मात्र कालांतराने त्यांचा जागतिक धिंगाणा अधिक वाढेल आणि त्याला कारणीभूत असेल पाकिस्तान आणि चीनचा पाठिंबा असं म्हटलं जातंय. येथे चीन किंवा पाकिस्तान भारतविरोधी संरक्षण दलाचे तळ उभारू शकतो असं देखील म्हटलं जातंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: In future what will happen in Afghanistan after Taliban Takeover news updates.

हॅशटॅग्स

#Taliban(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x