22 April 2025 3:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

चीन विश्वासघात करतोय? पँगोंग त्सो तलाव परिसरात चिनी सैन्य तैनात

India China Border, Pangon TSO lake

बीजिंग, २४ जून : नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेली संघर्षाची स्थिती निवळण्याचे संकेत मिळाले होते. काल चीनच्या हद्दीतील चुशुल-मोल्डो येथे दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली होती.

या चर्चेमध्ये नियंत्रण रेषेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यावर दोन्ही देशाच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये एकमत झाले. गलवान खोऱ्यातील संघर्ष तसेच अन्य वादांच्या मुद्दावर या बैठकीत चर्चा झाली. चांगल्या, सकारात्मक वातावरणात ही चर्चा झाली. एनडीटीव्हीने लष्करातील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले होते.

भारत आणि चिनी सैन्यात काल कमांडर स्तरावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती भारतीय लष्करानं दिली होती. दोन्ही देशांमध्ये सैन्य माघारी घेण्यावर एकमत झालं. पूर्व लडाखमध्ये वादग्रस्त जागांवरून सैन्य मागे घेण्याबद्दल चर्चा झाली असून दोन्ही बाजू याची अंमलबजावणी करतील, असं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलं होतं.

मात्र भारत आणि चीन संघर्षानंतर चर्चेने विषय सोडवू आणि सीमेवरील सैन्य मागे घेऊ असे आश्वासन देणाऱ्या चीनने आपला शब्द पाळलेला नाही. पँगोंग त्सो तलावाजवळ चीनने आपली कुमक वाढवली आहे. ओपन सोर्स इंटेलिजेंस अँनालिस्ट Detresfa ने नवीन सॅटेलाइट इमेज जारी केले आहेत.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पँगोंग त्सो तलाव परिसरात ठाण मांडले असल्याचं या सॅटलाईट इमेजनुसार कळतं आहे. तसेच, हळूहळू चीनची सैन्य लहान गटांद्वारे वाढत आहे. पँगोंग त्सो तलावापासून दक्षिणेकडील भागात १९ किमी अंतरावर चीनची सैन्याची जमवाजमव दिसून आली आहे. एकदाच मोठ्या संख्येने येण्याऐवजी चिनी सैन्य लहान गट करून जमा होत आहेत. ही सैन्य वाढ जाणीवपूर्वक करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

News English Summary: China has not kept its word, promising to resolve the issue through talks after the India-China conflict and withdraw troops from the border. China has stepped up its support near Pangong Tso Lake. Open source intelligence analyst Detresfa has released new satellite images.

News English Title: India China border satellite images claimed Chinese Army increasing near Pangon TSO lake News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IndiaChina(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या